Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दूरसंवाद आणि इतर मंत्रालयाच्या, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान पार्श्वभूमी असलेल्या गट अ मधल्या अधिकाऱ्यांच्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) मध्ये प्रतिनियुक्तीला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल


दूरसंवाद आणि इतर मंत्रालयाच्या, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान पार्श्वभूमी असलेल्या गट अ मधल्या अधिकाऱ्यांच्या, टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल ) मध्ये प्रतिनियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. टीसीआयएल हा आयएसओ 9001: 2008 आणि आयएसओ 2008, 14001:2004 प्रमाणित सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम असून दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा भक्कम पाया असलेल्या या उपक्रमाची केंद्र सरकारने 1978 मध्ये स्थापना केली.

N.Sapre/N.Chitale/Anagha