पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुहेरी कर तसेच प्राप्तीवरील कराची आर्थिक चुकवेगिरी टाळण्यासाठी भारत आणि न्यूझिलंड दरम्यान झालेल्या करारातील तिसऱ्या नियमात सुधारणा करण्याला मान्यता देण्यात आली. या करारावर 26 ऑक्टोबर 2016 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या नियमामुळे भारत आणि न्यूझिलंड दरम्यान कर विषयक माहितीची देवाण घेवाण करणे अधिक सुलभ होईल ज्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसेल. तसेच दोन्ही देशांदरम्यानच्या कर महसूल दाव्यातील रक्कम जमा करण्याला मदत होईल.
आधीच्या करारातील माहितीच्या आदान-प्रदानासाठी असलेल्या कलम 26 आता नवीन रुपात लागू करण्यात येणार असून नवीन मलम आंतरराष्ट्रीय प्रमाणकानुसार आहे. या नियमामध्ये कर आकारणीला मदत हे नवे कलम घालण्यात आले आहे. नवे नियम अंमलात येण्यासाठी दोन्ही देशातल्या संबंधित कायद्याद्वारे आवश्यक असलेली कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ज्या दिवशी अधिसूचना जारी होईल त्या दिवसापासून हे नियम लागू होतील.
B.Gokhale/J.Patanakar/Anagha