दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत आणि पोर्तुगाल दरम्यान राजशिष्टाचार विषयक नियमांत बदल करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीमुळे प्राप्तिकरावरच्या करासंदर्भात होणारी वित्तीय चोरी सुद्धा रोखता येऊ शकेल.
हा करार अस्तित्वात आल्यावर, भारत आणि पोर्तुगाल दरम्यान करविषयक माहितीचे आदानप्रदान होऊ शकेल. यातून दोन्ही देशातील कर अधिकाऱ्यांना करचोरीला आळा घालणे शक्य होईल.
B.gokhale/ R.Aghor/P.Malandkar