दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि वित्तिय चुकवेगिरी प्रतिबंधासाठी भारत आणि सायप्रस यांच्यातील कराराला आणि राजशिष्टाचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. उत्पन्नावरील करासंदर्भातील दुहेरी कर आकारणी आणि वित्तीय चुकवेगिरी प्रतिबंधाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
मॉरिशिअस सोबत दुहेरी कर आकारणी टाळण्यासंदर्भात नुकताच एक करार करण्यात आला. त्या धर्तीवर भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंधित कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. सिंगापूर सोबतच्या करारातील अशाच प्रकारचे बदल करण्याबाबत वाटाघाटी सुरु आहेत.
B.Gokhale/M.Pange/Anagha