नवी दिल्ली, 29 मार्च 2023
नमस्कार!
मी तुम्हाला भारतातील 1.4 अब्ज लोकांकडून शुभेच्छा देत आहे.
निवडून दिलेले नेते ही कल्पना प्राचीन भारतात जगातील इतर देशांच्या खूप आधी सामान्यपणे आढळणारी बाब होती. आपले प्राचीन महाकाव्य, महाभारतात, स्वतःचा नेता निवडणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे असे वर्णन केले आहे.
आमच्या पवित्र वेदांमध्ये व्यापक आधार असलेल्या सल्लागार संस्थांद्वारे राजकीय शक्ती वापरल्याचा उल्लेख आहे. प्राचीन भारतात प्रजासत्ताक राज्यांचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, ज्यात राज्यकर्ते वंशपरंपरेने आलेले नव्हते. भारत हीच खरी लोकशाहीची जननी आहे.
महामहीम,
लोकशाही ही केवळ व्यवस्था नाही; तो देखील एक आत्मा आहे. प्रत्येक माणसाच्या गरजा आणि आकांक्षा तितक्याच महत्त्वाच्या आहेत या विश्वासावर ती आधारित आहे. म्हणूनच, भारतात “सबका साथ, सबका विकास” हे आमचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे, ज्याचा अर्थ “सर्वसमावेशक वाढीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे” असा आहे.
जीवनशैलीतील बदलांद्वारे हवामान बदलाविरोधात लढा देण्याचा आमचा प्रयत्न असो, साठवणुकीद्वारे पाणी वाचवणे असो किंवा प्रत्येकाला स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवणे असो, प्रत्येक उपक्रमाला भारतीय नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे बळ मिळाले आहे.
कोविड-19 दरम्यान, भारताचा प्रतिसाद लोक-केंद्रित होता. त्यांच्यामुळेच भारतात निर्मित लसींच्या 2 अब्जाहून अधिक मात्रा देणे शक्य झाले. आमच्या ”लस मैत्री” उपक्रमाने लसींच्या लाखो मात्रा जगभरात पोहचवल्या.
याला ‘वसुधैव कुटुंबकम’ – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या लोकशाही भावनेने मार्गदर्शन केले.
महामहीम,
लोकशाहीच्या गुणांबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु मी एवढेच सांगू इच्छितो: अनेक जागतिक आव्हाने असूनही, भारत आज सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. हीच जगातील लोकशाहीची सर्वोत्तम जाहिरात आहे. डेमोक्रसी कॅन डिलिव्हर असे तेच म्हणत आहे. .
या सत्राच्या अध्यक्षतेसाठी अध्यक्ष यून, तुम्हाला धन्यवाद.
आणि आपल्या उपस्थितीबद्दल सर्व मान्यवर नेत्यांचे आभार.
खूप खूप धन्यवाद.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
My remarks at the 'Summit For Democracy'. https://t.co/6EXuxlGyd6
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023