Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुसऱ्या एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

दुसऱ्या  एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

दुसऱ्या  एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

दुसऱ्या  एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

दुसऱ्या  एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

दुसऱ्या  एफआयपीआयसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका


जयपूर येथे होत असलेल्या दुसऱ्या एफआयपीआयसी (भारत-पॅसिफिक बेटे सहकार मंच) परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजी प्रजासत्ताकचे पंतप्रधान एच ई जोसैय्या बायानीमारमा, स्वतंत्र पापुआ राज्य न्यू गिनीचे पंतप्रधान एच. ई. पिटर ओ नील, व्हानुआतु प्रजासत्ताकचे पंतप्रधान एच ई सातो किलमन, नैरु प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष एच. ई बेरोन वाका यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणा तसेच सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सभासदत्व मिळण्याबाबत वरील सर्व नेत्यांनी जोरदार पाठींबा दिला. हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी तसेच आपत्ती निवारणासाठी भारत प्रशांत महासागरातील सर्व बेट- राष्ट्रांना एकत्र घेऊन काम करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.

दोन्ही सरकारांच्या प्रयत्नांतून व भारतीय आरोग्यसेवेतील अग्रणी कंपन्यांच्या मदतीने फिजी येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात भारताच्या सहकार्याचा मुद्दाही पंतप्रधानांनी यावेळी मांडला. त्याचप्रमाणे, फिजी येथे औषधोत्पादन प्रकल्प सुरु करण्याची तसेच तेथील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली ज्याविषयी चर्चा करण्यासाठी संबंधित शिष्टमंडळाची लवकरच फिजी येथे बैठक होईल. कृषी, दुध उत्पादन क्षेत्रात तसेच आपत्ती निवारणासाठी क्षमता विकसन करण्यासाठीही भारत फिजीला सहकार्य करेल. व्यापार क्षेत्रात विशेषत: बांधकाम क्षेत्रातील व्यापार संधी शोधण्यासाठी भारतीय व्यापारी शिष्टमंडळ लवकरच फिजीला भेट देईल, यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शविली
पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी विशेषत: रस्ते, महामार्ग व विमानतळे बांधण्यासाठी भारत पापुआ न्यू गिनीलाही साहाय्य करेल. या कामासाठी भारतीय आयात निर्यात बँकेकडून १ अब्ज रूपये कर्ज घेण्याची इच्छा पापुआ न्यू गिनीने व्यक्त केली, ज्यावर भारत सकारात्मक प्रतिसाद देईल. संरक्षण, क्षमता विकसन, लोक प्रशासन, आरोग्य, शिक्षण तसेच तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. ओएनजीसी विदेश कंपनी सोबत लवकरच सहयोग होईल अशी आशा पापुआ न्यू गिनीने व्यक्त केली.

व्हानुआतुच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर संयुक्त राष्ट्र सुधारणांबाबत तसेच व्हानुआतुमध्ये क्षमता विकसन करण्याबाबत चर्चा केली. याकामासाठी विशिष्ट गरजा ओळखून आवश्यक निधीची तरतूद करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दाखविली. पाम चक्रीवादळादरम्यान भारताने दिलेल्या २,५०,००० युएस डॉलर आर्थिक मदतीबद्दल व्हानुआतुने भारताचे आभार मानले.

वाढत्या समुद्र पातळीचा सामना करण्यासाठी म्हणून समुद्र भिंती बांधण्यात मदत केल्याबद्दल नौरूने भारताची प्रशंसा केली. विकास कामातील सहकार्य पुढे नेण्यासाठी व नौरूमध्ये आपत्ती व्यवस्थापन तसेच क्षमता निर्मितीबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शविले. नौरुतील बंदरांवर विनासायास जहाजे गोदीत आणणे शक्य व्हावे यासाठी तेथील जहाजे बांधण्याच्या जागा दुरुस्त करण्याचे आदेश भारताने आपल्या तज्ज्ञांना दिले आहेत.

A.Desai/N.Sapre