पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली कन्टोन्मेंटच्या कंधार लाईन्स येथे केंद्रीय विद्यालय क्र. ४च्या बांधकामासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेला संरक्षण विभागाची ४ एकर जमीन वार्षिक १ रुपया एवढ्या नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करायला मंजुरी दिली.
पार्श्वभूमी
सध्या दिल्ली कन्टोन्मेंट येथील केंद्रीय विद्यालय क्र. 4, सर्व्हे क्र.14 मधील तात्पुरत्या इमारतीत कार्यरत आहे. 1994 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. सध्या 956 मुले या शाळेत शिकत आहेत. केंद्रीय विद्यालयाची कायमस्वरूपी इमारत उभी राहिल्यास दिल्ली कॅंटोन्मेंट आणि आसपासच्या परिसरातील मुलांना आवश्यक सुविधांसह योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor