पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एनबीसीसीच्या माध्यमातून सरोजिनी नगर,नेताजी नगर येथे, सीपीडब्लूडीच्या माध्यमातून कस्तुरबा नगर, त्यागराज नगर श्रीनिवासपुरी आणि मोहम्मदपूर येथे सात साधारण निवासी घरकुल जीपीआरए वसाहतिचा पुनर्विकास करायला मंजुरी दिली. सध्या येथे १२,९७० घरे असून पुनर्विकास झाल्यावर त्यांची संख्या २५,६६७ पर्यंत जाईल.
नेताजी नगर येथे सुमारे २. ४२ लाख चौरस मीटर भूखंडावर सरकारी निवासस्थाने देखील विकसित करण्यात येणार आहेत.
३० वर्षांचा देखभाल आणि परिचालन खर्च धरून एकूण अंदाजे खर्च ३२,८३५ कोटी रुपये आहे. स्वयं अर्थसहाय्य तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पाच वर्षात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
S.Kane/B.Gokhale