Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख धर्मगुरु महामहिम सैदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख धर्मगुरु महामहिम सैदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख धर्मगुरु सैदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत नऊ सदस्यीय प्रतिनिधी मंडळी होते.

दाऊदी बोहरा समाजाच्या सामाजिक सुधारणांबाबतच्या प्रयत्नांची तारीफ करतांना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने या सर्व उपक्रमांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. मुंबईतल्या भेंडी बाजार क्षेत्राचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी दाऊद बोहरा समाजाने केलेल्या प्रगतीचीही पंतप्रधानांनी प्रशांसा केली.

गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये शौचालयांच्या विकासासाठी दाऊदी बोहरा समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

(Release ID :136964)
J. Patankar / S. Tupe / M. Desai