Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दलित उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे दलित उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने ही परिषद आयोजित केली होती.

जनतेने केवळ आपल्या हक्कांबद्दल बोलता कामा नये तर कर्तव्यांबद्दलही बोलायला हवे असे आपण “मन की बात” कार्यक्रमाच्या एका भागात बोलताना सांगितल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. दलित उद्योजकांचा हा मेळावा म्हणजे कर्तव्याबद्दल केवळ बोलणे नव्हे तर ते कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणेही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटनेचे शिल्पकार म्हणून गौरव केला जातो मात्र त्‍याबरोबरच ते थोर अर्थतज्ञही होते अशा शब्दात पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातल्या औद्योगिकीकरणाविषयी दृष्टीकोन विषद करताना स्वत:च्या मालकीची जमीन नसलेले दलित केवळ औद्योगिकरणाद्वारेच प्रगती करु शकतात असे म्हणाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आर्थिक समावेशकतेवर केंद्र सरकारचा भर असून त्यामागे रोजगार मिळवणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे तयार करण्याचा उद्देश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासंदर्भात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. नव उद्योजकांसाठीच्या व्‍हेंचर कॅपिटल फंडचा उल्लेखही त्‍यांनी केला.

यावेळी पाच दलित उद्योजकांना सर्वोत्कृष्ट व्यापार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

N.Chitale/M.Desai