आंतरराष्ट्रीय लस संस्थेच्या प्रशासकीय परिषदेचे भारताने पूर्ण सदस्य स्वीकारण्याच्या प्रस्तावाला, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात दक्षिण कोरियातील सेऊल येथे असणाऱ्या “आंतरराष्ट्रीय लस संस्थे”ला पाच लाख अमेरिकी डॉलर्सचे वार्षिक योगदान देण्याच्या बाबींचाही समावेश आहे.
“आंतरराष्ट्रीय लस संस्था” ही संयुक्त राष्ट्र विकास उपक्रमाचा उपक्रम असून तिची स्थापना 1997 मध्ये झाली आहे. विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करणाऱ्या लसींचे संशोधन आणि विकसन ही संस्था करते.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar