Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दक्षिण आशिया वन्यजीवन अंमलबजावणी श्रृंखला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, दक्षिण आशिया वन्यजीवन श्रृंखला (एसएडब्ल्यूइएन) आणि भारत याबाबत भारताने ससंदीय ठराव करण्याला आणि औपचारिक सदस्य होण्याला मान्यता देण्यात आली. यामुळे सहकार्य, भागीदारी आणि क्षमता निर्मितीद्वारे सीमापार होणारे वन्यजीवन गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी सदस्य देशातील सहकार्य मजबूत होईल.

एसएडब्ल्यूइएन या प्रादेशिक श्रृंखलेमध्ये दक्षिण आशियातल्या अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या आठ देशांचा समावेश आहे. या विभागातील वन्यजीवन गुन्हयांना आळा घालण्यासाठी आणि अवैध व्यापार रोखण्यासाठी एक समाईक आणि मजबूत आंतर-शासकीय संस्था म्हणून कार्य करण्याचे लक्ष्य या श्रृंखलेसमोर आहे.

J.Patnakar/B.Gokhale