Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दक्षिण आशियाई उपग्रह- काही ठळक वैशिष्ट्ये

दक्षिण आशियाई उपग्रह- काही ठळक वैशिष्ट्ये


• दक्षिण आशियाई देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखी भेट दिल्यामुळे अंतराळ क्षेत्रातील मुत्सद्देगिरी नव्या उंचीवर पोहोचली आहे.

• शेजारील देशांसाठी प्रथमच अशा प्रकारचा विनामूल्य दळणवळण उपग्रह सोडण्यात आला.

• या उपग्रहाचे वजन 2 टनांपेक्षा अधिक असून तो बनवायला तीन वर्षात 230 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला.

• संपूर्ण दक्षिण आशियासाठी हा उपग्रह आहे.

• या उपग्रहावर 12 केयू बॅन्ड ट्रान्सपॉन्डर्स बसवण्यात आले असून दळणवळण वाढवण्यासाठी शेजारी देश त्याचा वापर करु शकतात.

• प्रत्येक देशाला किमान एका ट्रान्सपॉन्डर्सचा वापर करुन स्वत:चे प्रोग्रामिंग करता येईल.

• या उपग्रहामुळे डीटीएच दूरचित्रवाणी, व्हीसॅट लिंक्स, दूर-शिक्षण टेलिमेडिसिन आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल, भूकंप, चक्रीवादळ, पूर आणि त्सुनामी सारख्या आपत्तीच्या वेळी महत्वपूर्ण संपर्क जोडणी हा उपग्रह पुरवेल.

• या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यावर या उपग्रहाचे लाभ मिळवणारे सर्व सात दक्षिण आशियाई देशांचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र आले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar