पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर आज बेंगळुरूत दाखल झाले. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत भाग घेतला आणि नंतर ग्रीसचा दौरा केला. पंतप्रधानांनी स्थानिक विचारवंतांशी विविध द्विपक्षीय आणि स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांनी दोन्ही देशांतील भारतीय समुदायांची भेट घेतली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चांद्रयान-3 मून लँडरचे लँडिंग अनुभवल्यानंतर पंतप्रधान इस्रोच्या चमूशी संवाद साधण्यासाठी बेंगळुरूत दाखल झाले.
एचएएल विमानतळाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि त्यांनी जय जवान, जय किसान अशा घोषणा देत उपस्थितांना संबोधित केले. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसमध्येही भारताच्या अभूतपूर्व यशाबद्दल असाच उत्साह असल्याचे मोदी म्हणाले.
इस्रोच्या टीमसोबत राहण्याची इच्छा व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, परदेश दौऱ्याहून परतल्यावर आधी बेंगळुरूला येण्याचा निर्णय घेतला होता. प्रोटोकॉलशी संबंधित अडचणी न घेण्याच्या विनंतीसंदर्भात सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी स्वागतासाठी सर्वांचे आभार मानले आणि जमलेल्या नागरिकांचा उत्साहाला दाद देत रोड शो च्या माध्यमातून चांद्रयान टीममध्ये सहभागी होण्यासाठी इस्रोकडे रवाना झाले.
****
S.Thakur/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
I am very grateful to the people of Bengaluru for the very warm welcome this morning. pic.twitter.com/oV0NcUy9lR
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023