Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

थिरूवल्लूवर दिनानिमित्त पंतप्रधानांनी थिरूवल्लूवर यांना वाहिली आदरांजली


नवी दिल्ली 16 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोर विचारवंत थिरूवल्लूवर यांना थिरूवल्लूवर दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. मोदी यांनी यानिमित्ताने थिरूवल्लूवर यांच्या उदात्त विचारांचे स्मरण करून, तरुणांना कुरलचे वाचन करण्याचा आग्रह देखील केला आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“थिरूवल्लूवर दिनानिमित्त मी आज प्रसिद्ध विचारवंत थिरूवल्लूवर यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण करतो. थिरूवल्लूवर यांच्या विचारांमध्ये असलेल्या वैविध्यामुळे ते सर्व थरातील लोकांसाठी प्रेरणेचा मोठा स्त्रोत ठरत आहेत. थिरूवल्लूवर यांची कुरल ही रचना वाचण्याचे आवाहन देखील मी देशातील तरुणांना करू इच्छितो.”

***

Gopal C/Sanjana/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pib_goa  PM India pibgoa[at]gmail[dot]com  PM India/PIBGoa