Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

थायलंडच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

थायलंडच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

थायलंडच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहीम पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओ-चा, स्त्री आणि पुरुषगण, भारतात तुमचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या उच्चस्तरीय राजकीय संबंधांमध्ये तुमचा दौरा हा अत्युच्च क्षण आहे.

आम्हाला माहीत असलेल्या भूभागातून तुम्ही आला आहात. रामापासून बुध्दाच्या विचारांपर्यंत, एकत्रित सांस्कृतिक वारशामध्ये आपले संबंध आढळून येतात. आपल्या जनतेच्या ऐतिहासिक परस्पर संबंधांमुळे आपल्या भागीदारीला मजबूत पाया लाभला आहे. थायलंड हा विश्वासू आणि महत्त्वाचा मित्र असून दक्षिण-पूर्व आशियामधील आजच्या निकटच्या भागीदारांपैकी एक आहे.

मित्रांनो,

आज पंतप्रधानांनी आणि मी आमच्या द्विपक्षीय संबंधाचा सर्वांगिण आढावा घेतला :
संस्कृतीपासून व्यापारापर्यंत,

आमच्या जनतेच्या निकटच्या संबंधांपासून मजबूत संपर्क यंत्रणेपर्यंत आणि दहशतवादाचा बिमोड करण्यापासून संरक्षण व सुरक्षेपर्यंत. आपल्याला माहीतच आहे की दहशतवादाचा वेगाने होणारा प्रसार आणि जहाल उदारमतवादी आदर्शवाद यामुळे आपल्या दोन्ही समाजांमध्ये समान आव्हान निर्माण झाली आहेत.

आणि आपण हे जाणतो की, आपल्या निकटच्या सुरक्षा भागीदारीमुळे अशा धोक्यांपासून आपल्या लोकांचे रक्षण करण्यास मदत मिळेल. या आव्हानांचा सामना करण्याच्या आपल्या एकत्रित उद्देशांसह थायलंडने दिलेली मदत आणि सहकार्यासाठी भारत नेहमीच ऋणी राहील.

दहशतवादापलीकडे आपण सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक अपराध आणि मानवी लष्करी यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपले सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्याचे आपण ठरवले आहे.

मित्रांनो,

आपल्या दोन्ही देशांच्या सरहद्दीजवळचा प्रदेश फार दूर नाही.

आणि आपण सागरी शेजारी देखील आहोत.

म्हणूनच मी आणि पंतप्रधानांनी संरक्षण व सागरी सहकार्य या क्षेत्रात भागीदारी करण्याचे ठरवले आहे.

आपले द्विपक्षीय हित साधण्यासाठी आणि आपल्या एकत्रित प्रादेशिक उद्दिष्टांना प्रतिसाद देण्यासाठी भागीदारी. आणि अशी भागीदारी जिला आकार येईल,

तज्ञांच्या आणि अनुभवांच्या आदानप्रदानाने,

कर्मचाऱ्यांच्या अधिकाधिक देवाण-घेवाणीने आणि अधिक सरावाने, सागरी चाचेगिरीविरोधात सहकार्य,

नौदल गस्तीमधील दृढ संबंध,

संरक्षण संशोधन व विकास आणि उत्पादन क्षेत्रात संबंध विकसित करून

मित्रांनो,

परस्परांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात व्यापार आणि उद्योग प्रवाह महत्त्वाची जीवनरेखा आहेत.

आपल्या अधिक वैविध्यपूर्ण व्यावसायिक संबंधांमुळे केवळ दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनाच लाभ होणार नाही तर यामुळे अधिक प्रांतीय आर्थिक समृध्दी येईल यावर आमचे एकमत आहे.

यासंदर्भात, भारत-थायलंड संयुक्त व्यापार मंचाच्या आज होणाऱ्या पहिल्या बैठकीचे आम्ही स्वागत करतो. आपल्या दोन्ही देशांमध्ये उदयाला येणाऱ्या व्यापार संधी मिळवण्यासाठी आम्ही त्यांना आणि अन्य उद्योग क्षेत्रातील हितधारकांना प्रोत्साहन देतो. व्यापाराव्यतिरिक्त, निर्मिती आणि गुंतवणुकीच्या देखील अमाप संधी आहेत.

पायाभूत क्षेत्रात, विशेषत: पर्यटन पायाभूत विकास क्षेत्रातील थायलंडचे सामर्थ्य आणि या क्षेत्रातील भारताचे प्राधान्य यांच्यात आम्हाला एक विशिष्ट धागा दिसतो.

माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, वाहनांचे सुटे भाग आणि यंत्रसामुग्री ही सहकार्यासाठी अन्य काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. संतुलित सर्वसमावेशक आर्थिक आणि भागीदारी कराराच्या त्वरित निर्णयाला आमचे प्राधान्य आहे.

मित्रांनो,

आमच्या अर्थव्यवस्थांमध्ये वस्तू, सेवा, भांडवल आणि मनुष्यबळाचा ओघ वाहता राहावा यासाठी हवाई, जमीन आणि सागरी मार्गांचे मजबूत जाळे आवश्यक आहे असे पंतप्रधान आणि मी जाणून आहोत.

म्हणूनच, भारत-म्यानमार-थायलंड त्रिकोण महामार्ग पूर्ण करण्याला आणि आमच्या तीन देशांमध्ये मोटार वाहन कायद्यावर लवकर स्वाक्षऱ्या करण्याला आमचे प्राधान्य आहे.

भारताच्या विकासासाठी संपर्क व्यवस्था हे देखील प्राधान्य क्षेत्र आहे.

आमच्या ईशान्येकडील राज्यांमधून दक्षिण-पूर्व आशियात जाण्याच्या मार्गात सुधारणा झाली तर आमच्या दोन्ही देशातील जनतेला त्याचा लाभ होईल.

मित्रांनो,

मजबूत दळणवळण व्यवस्था ही केवळ द्विपक्षीय व्यापार संबंधांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक नाही तर यामुळे आपले लोक देखील जवळ येतील आणि विज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक आणि पर्यटन सहकार्य वृध्दींगत होण्यास मदत होईल.

पुढील वर्षी, आमच्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आम्ही थायलंडमध्ये भारत महोत्सव तर भारतामध्ये थायलंड महोत्सव साजरा करणार आहोत.

यावर्षी, भारत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांची 125 वी जयंती देखील साजरी करीत आहेत.

मला आनंद होत आहे की, भारतीय राज्य घटनेचा लवकरच थाई भाषेत अनुवाद केला जाणार आहे.

मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, भारतामध्ये थायलंडहून अधिक पर्यटक यावेत आणि त्यांना भारतातील बौध्द स्थळांना भेट देता यावी यासाठी आम्ही लवकरच थायलंडच्या नागरिकांसाठी दुहेरी प्रवेश ई-पर्यटक व्हिसा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

महामहीम,

थायलंडच्या राजघराण्याच्या भारताप्रती असलेल्या प्रेमाची भारताने नेहमीच प्रशंसा केली आहे.

राजकन्या महा चक्री सिरींदहॉर्न या बऱ्याचदा भारतात येत असतात आणि त्यांचे भारतात नेहमीच स्वागत असेल. यावर्षी पुन्हा एकदा त्यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

त्याचप्रमाणे राजकन्या वार्जिलोंगकोर्न यांचे त्यांच्या सोयीनुसार भारतात स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत.

शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, थायलंडचे “लुक वेस्ट” आणि “ॲक्ट इस्ट” धोरण यांच्या संगमाने आमच्या भागीदारीच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रकाशमान झाला आहे.

महामहीम, मी पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात स्वागत करतो.

धन्यवाद!

S.Kane/B.Gokhale