नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
तेलंगणा राज्यातील मुलुगु जिल्ह्यातील समक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा, 2009 मध्ये आणखी सुधारणा करणारे केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) विधेयक, 2023 संसदेत सादर करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, 2014 (2014 चा क्रमांक 6) च्या तेराव्या अनुसूचीनुसार ही स्थापना केली जाणार आहे.
या विद्यापीठासाठी 889.07 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली जाईल.नवीन विद्यापीठामुळे तेलंगणा राज्याची उच्च शिक्षणातील गुणवत्ता तर वाढेलच, शिवाय आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी आदिवासी कला, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान प्रणालींमध्ये त्यांना शिक्षण आणि संशोधन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आदिवासींना उच्च शिक्षण आणि प्रगत ज्ञानाचे मार्ग खुले होतील. हे नवीन विद्यापीठ अतिरिक्त क्षमता निर्माण करेल आणि प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न करेल.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai