Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तुमकूर जिल्हयात हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर निर्मिती युनिटची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी

कर्नाटक मधल्या तुमकूर जिल्हयातल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर निर्मितीच्या नव्या युनिटची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झली.

तुमकूर इथले हे निर्मिती युनिट हे साधारण नाही तर संपूर्ण जग त्याची दखल घेईल असे आहे असे पंतप्रधाानांनी यावेळी सांगितले.

माजी पंतप्रधान लालबहाद्‌दूर शास्त्री यांच्या प्रसिध्द “जय जवान जय किसान” या घोषणेचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गेल्या 50 वर्षात देशाने कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचे सांगून अन्नधान्यांत देश आता स्वयंपूर्ण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय लष्कर वापरत असलेली शस्त्रास्त्रे आणि हत्यारे जगातली सर्वोत्तम आहेत याची खातरजमा करण्याची ही वेळ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी आयात शस्त्रास्त्रावरचे अवलंबित्व भारताने नष्ट करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. ही शस्त्रास्त्रे महागडी असतात आणि अदययावत तंत्रज्ञाना नुसारही नसतात असे ते म्हणाले.

संरक्षण सामग्री उत्पादनावर भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तुमकूरमधे निर्माण होणारी हेलिकॉप्टर्स, दुर्गम ठिकाणी कार्यरत असणा-या सैनिकांसाठी वापरली जातील. या युनिटमधे निर्माण झालेले पहिले हेलिकॉप्टर 2018 मधे उड्डाण करेल. या कारखान्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुमारे 4000 कुटुंबाना उपजिविकेचे साधन उपलब्ध होणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. भारतातल्या औद्योगिकीकरणाकडे समाजातल्या गरिब आणि शोषितांच्या सबलीकरणाचे माध्यम म्हणून पहाण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे स्मरण पंतप्रधानांनी केले. तुमकूर इथले हे उत्पादन युनिट म्हणजे त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, डी व्ही सदानंद गौडा, अनंतकुमार, केंद्रीय राज्यमंत्री जी एम सिध्देश्वर यावेळी उपस्थित होते.

SmkN.ChitleI.Jhala