Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिसऱ्या भारत आफ्रिका शिखर परिषद 2015 संदर्भात पंतप्रधानांचे निवेदन


26 ते 29 ऑक्टोबर 2015 दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन करतांना भारताला मोठा अभिमान वाटत आहे. यावेळी सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि आम्ही सर्व 54 आफ्रिकन देश आणि आफ्रिकन संघ राज्यांना आमंत्रित केले आहे.

आफ्रिकेबाहेर होणाऱ्या सर्वाधिक मोठया शिखर परिषदेपैकी ही एक परिषद असणार आहे. अधिक चांगले भविष्य साध्य करण्यासाठी भारत आणि आफ्रिकेने अधिक-अधिक प्रबळपणे कार्य करण्याच्या आमच्या इच्छाशक्तीचे हे प्रतिबिंब आहे.

भारत आणि आफ्रिकेमधील ऐतिहासिक संबंध परस्परांविषयी आदर, विश्वास आणि एकजूट यांवर आधारित आहेत. अलिकडच्या काळात, आमच्या संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे आणि आता हे संबंध परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या भागीदारीत रुपांतरीत झाले आहेत.

भारत हा आफ्रिकेतील मोठा गुंतवणूकदार असून 30 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या भारतीय गुंतवणुकीचा, आफ्रिकेतील, रोजगार निर्मितीत मोठा वाटा आहे.

मन जुळल्याने आणि सहकार्याचे हात पुढे आल्याने आयएएफएस III अर्थात तिसरी भारत आफ्रिका शिखर परिषद भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध दृढ होण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल.

भारत-आफ्रिका शिखर परिषदेच्या अनुषंगाने इतर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि आफ्रिकाई देशाचे व्यापार मंत्री उद्योजकांच्या शिष्टमंडळासह, 23 ऑक्टोबर रोजी भेटणार आहेत.

भारतातील आघाडीच्या चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या वतीने शिखर परिषदेच्या स्थानी, 27 आणि 29 ऑक्टोबर रोजी व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीएसईने भारत-आफ्रिका सहकार्यावर आधारित आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये 16 हजाराहून अधिक शाळा सहभागी होणार आहेत.

J.Patnakar/S.Tupe