Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य


महामहीम, महानुभाव, मी आणि सहअध्यक्ष असलेले राष्ट्राध्यक्ष मुगाबे, हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे. आपल्याला संपूर्ण आफ्रिकेचा आवाज ऐकण्याची संधी मिळाली.

पहिल्या दोन शिखर परिषदांवेळी आपण काही देशांपर्यंत मर्यादित होतो. आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की सर्व ५४ देश यामध्ये भाग घेत आहेत.

तुमची प्रतिक्रिया या गोष्टीला समर्थन दर्शवते की हे भारत-आफ्रिका भेटीचे योग्य स्वरूप आहे.

तुमचे विचार मांडल्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे.

आपल्या मित्रांच्या विवेकाहून अधिक आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही.

आपला देश आणि आफ्रिकेप्रती आपल्या महत्वाकांक्षा, जगाप्रती आपली दृष्टी, भारताप्रती आपल्या भावना, आमचे सहकार्य तुमच्या अपेक्षांनी प्रेरीत आहे.

तुमची मैत्री आणि विश्वास आमच्यासाठी सन्मान आणि ताकदीचा स्रोत आहे.

तुमचे बोलणे ऐकून हा विश्वास अजून प्रबळ झाला की भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये ही भागीदारी नैसर्गिक आहे; कारण नियती एकमेकांशी जवळीक साधणारी आहे आणि आपल्या महत्वाकांक्षा तसेच आव्हाने मिळतीजुळती आहेत.

समावेशक वाढ, सशक्त नागरिक आणि सततचा विकास, एकात्मिक व सांस्कृतिक रूपाने जिवंत आफ्रिका तसेच उचित जागतिक स्थान व जगासाठी मजबूत भागीदार, शांतीपूर्ण व सुरक्षित आफ्रिका यासार्वांवर आधारित समृद्ध आफ्रिका बनविण्याच्या तुमच्या ध्येयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत काम करू.

आम्ही आमच्या सहकार्याला अधिक प्रभावी कसे बनवू शकतो यासाठी मी तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले.

तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कर्ज व्यवस्थेच्या पुनर्रचनेमध्ये खूप सहाय्यक ठरतील. आम्ही तुमच्याकडील विशेष परिस्थिती लक्षात ठेऊ आणि आम्ही त्याच्या वापरामध्ये अधिक वेगाने तसेच पारदर्शकतेने काम होईल हे निश्चित करू.

आफ्रिकेमध्ये संस्था स्थापना प्रक्रियेत आम्ही जे शिकलो त्‍यामुळे आम्हाला या योजनांना अधिक प्रभावीपणे लागू करण्यात मदत होईल.

आम्ही आपल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने प्रोत्साहित झालो आहोत. आणखी अनुकूल वातावरण निर्माण करून भारतात राहणे, शिकणे व प्रशिक्षण घेणे यासाठी आणखी अनुकूल वातावरण निर्माण करू.

माझ्या लक्षात आले की तंत्रज्ञानासंदर्भातील भागीदारीला तुम्ही किती महत्व देता. भारतात, आम्ही आफ्रिकेतील दूरवरच्या ठिकाणी अति दुर्बल लोकांचे जीवन बदलणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देऊ.

आम्ही भारत आणि आफ्रिकेमध्ये व्यापार तसेच गुंतवणूक यांचा ओघ वाढविण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊ. आम्ही आमच्या व्यापाराला अधिक संतुलित करू. भारतीय बाजारांपर्यंत आफ्रिकेचा प्रवेश आम्ही सुकर बनवू. आम्ही ३४ देशांना सीमा शुल्क मुक्त प्रवेश, संपूर्ण व कार्यान्वित करण्याचे निश्चित करू.

कित्येक देशांबरोबर आमचे चांगले सुरक्षा व संरक्षण सहकार्य संबंध आहेत. आम्ही हे संबंध द्विपक्षीय, बहुपक्षीय व क्षेत्रीय व्यवस्थांच्या माध्यमातून तयार केले आहेत. निकट सुरक्षा व संरक्षण सहकार्य, विशेषत: क्षमता विकास, भारत-आफ्रिका सहभागाचा प्रमुख आधार असेल.

आम्ही आतंकवादाविरुद्ध आपले सहकार्य वाढवू आणि याविरुद्ध समान ध्येयासाठी संपूर्ण जगाला एकजूट करू.

महामहीम, आम्ही विचार आणि कारवाई तसेच इच्छा आणि कार्यान्वयन यांमधील फरकाविषयी सचेत आहोत.

अशाप्रकारे, कार्यान्वयन देखील योजना सुरु करण्याप्रमाणेच महत्वपूर्ण असतील. आम्ही आमच्या निरीक्षण व्यवस्थेला मजबूत बनवू. यामध्ये आफ्रिकी संघासोबत मिळून संयुक्त निरीक्षण व्यवस्था बनविणे समाविष्ट असेल.

महामहीम, आमची एकजूटता आणि एकता अधिक समावेशक, निष्पक्ष आणि लोकशाहीवादी विश्व व्यवस्थेच्या ध्येयासाठी प्रमुख बाल असेल. आम्ही त्याचा मार्ग निर्धारित करण्याच्या निर्णायक स्थितीत आहोत.

संयुक्त राष्ट्रात सुधारणांची मागणी, वैश्विक व्यापारात आपल्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी, विकास अजेंडा 2030 साठी वैश्विक भागीदारी तयार करण्यासाठी तसेच जलवायू परिवर्तन विषयक पॅरिस बैठकीतून आमच्या अपेक्षांचे अनुसरण करण्यासाठी आपले सहकार्य अधिक दृढ बनवावे लागेल.

आमची दृष्टी आणि महत्वाकांक्षा यापासून तयार झालेले विश्व आपल्यापैकी प्रत्येकाला यश प्राप्त करण्याची चांगली संधी देईल.

आज आम्ही या शिखर परिषदेचे घोषणा पत्र आणि महत्वपूर्ण सहकार्य प्रारूप स्वीकारले आहे.

परंतु, संख्या आणि दस्तऐवज यापेक्षा अधिक, सर्वात मोठा परिणाम, आपली नव्याने झालेली मैत्री, सशक्त भागीदारी आणि व्यापक एकजूटता यात आहे.

महामहीम, आपल्या शिखर परिषदेचा आकार आणि आपला सहभाग यांच्या महत्वाकांक्षी ध्येयांना पाहता, आम्ही सर्व या गोष्टीवर सहमत झालो आहोत की ही शिखर परिषद दर पाच वर्षांनी व्हायला हवी.

खरतर आफ्रिका नेहमी आमच्या विचारांच्या केंद्रस्थानी राहील.आफ्रीकेसोबत आमचे संबंध दृढ आणि नियमित स्वरूपाचे राहतील. द्विपक्षीय दौऱ्यांवर आपण येथे याल, अशी मी अशा करतो आणि मी येणाऱ्या काळात आफ्रिकेच्या सर्व क्षेत्रात दौऱ्यावर जाण्याची प्रतीक्षा राहील.

शेवटी, तुमचे, तुमच्या शिष्टमंडळाचे आणि आफ्रिकेहून आलेल्या अन्य विशेष व्यक्तींचे आभार मानतो. आशा आहे की आपण आपल्या प्रवासाचा आनंद घेतला असेल. दिल्लीमध्ये आनंदी वातावरण आणल्याबद्दल आपले धन्यवाद. मला आशा आहे की पॅरिसमध्ये सीओपी-21 आणि सौर युती दरम्यान आपली भेट होईल.

या शिखर परिषदेला मोठे यश दिल्याबद्दल मी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे, आपल्या अधिकाऱ्यांचे आणि दिल्ली शहराचे आभार मानतो.

आजच्या सरत्या दिवसासोबत, आपल्या सहकार्याला नवी उर्जा आणि उद्येश मिळाले आहे आणि जगाला याच्या भविष्यावर नवा विश्वास बसेल.

धन्यवाद। खूप खूप धन्यवाद !

S.Pophale/S.Tupe/N.Sapre