Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडू बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


तामिळनाडूच्या निलगिरीस जिल्ह्यात घडलेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या भावना आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी PMNRF अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी रु. 2 लाख आणि जखमींना रु.50,000 अनुदान जाहीर केले आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे की:

“तामिळनाडूच्या निलगिरीस जिल्ह्यात कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. माझ्या भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयांचे अनुदान प्रत्येक मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

***

JPS/SN/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai