Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडू,मदुराई येथे एम्सच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांचे भाषण

तामिळनाडू,मदुराई येथे एम्सच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांचे भाषण

तामिळनाडू,मदुराई येथे एम्सच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांचे भाषण

तामिळनाडू,मदुराई येथे एम्सच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांचे भाषण


मीनाक्षी-सुंदेश्वर मंदिर आणि महादेवांच्या आशीर्वादांकरिता प्रसिद्ध असलेले स्थान, मदुराई येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे.

देशाने काल प्रजासत्ताक दिन साजरा केला. एका अर्थाने, आज मदुराई मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी करणे हे “एक भारत श्रेष्ठ भारत” या आमच्या संकल्पनेला दर्शविते.

मित्रांनो,

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, आरोग्य सेवा क्षेत्रात दिल्लीतील एम्सने स्वतःला एक ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित केले आहे. मदुराई मध्ये एम्सची स्थापना झाल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की, आरोग्य सेवा क्षेत्रातील हा ब्रॅण्ड देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे-अगदी कन्याकुमारी ते काश्मिर ते मदुराई; आणि गुवाहाटी ते गुजरात. मदुराई येथे बांधण्यात येणाऱ्या एम्सचा खर्च सोळाशे कोटींहून अधिक होणार आहे. तामिळनाडूच्या सर्व जनतेला याचा फायदा होईल.

मित्रांनो,

 राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आरोग्य सेवाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, जेणेकरून प्रत्येकजण आरोग्यदायी राहिल आणि आरोग्य सेवा सर्वांना परवडेल. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना अंतर्गत आम्ही भारतातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्यास पाठिंबा दिला आहे. मदुराई, तंजावर आणि तीरुवेलीनेली वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुपर स्पेशलिटी केंद्रांचे उद्‌घाटन करतांना आज मला आनंद होत आहे.

मिशन इंद्रधनुष ज्या वेगाने आणि प्रमाणात आपले काम करत आहे त्यावरून असे वाटते की, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रात ते नवीन उदाहरण प्रस्थापित करत आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे सुरक्षित गरोदरपणा आणि प्रसूतीला जन आंदोलन बनवित आहेत.

गेल्या चार-साडे वर्षात पूर्व पदविका वैद्यकीय जागा 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आयुष्मान भारत योजना लागू करणे हे एक मोठे पाऊल आहे.

आपल्या देशातील नागरिकांना व्यापक प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सुनिश्चित करण्यासाठी एक काळजीपूर्वक विचार केला जाणारा हा दृष्टीकोन आहे. आरोग्यविषयक समस्यांचे पूर्णतः निराकरण करण्यासाठी आयुष्मान भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सर्वसमावेशक प्राथमिक सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी 1.5 लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना रुग्णालय उपचारांसाठी 10 कोटींहून अधिक गरजू कुटुंबाना दरवर्षी प्रती कुटुंब 5 लाख रुपयांचे आर्थिक संरक्षण प्रदान करते.

ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.

तमिळनाडूतील 1 कोटी 57 लाख लोकांना या योजनेंतर्गत, समविष्ट करण्यात आले आहे हे ऐकून मला आनंद होत आहे.

तामिळनाडू मध्ये केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत 89 हजार लाभार्थ्यांना दाखल करण्यात आले आणि तमिळनाडूतील रुग्णांसाठी दोनशे कोटींहून अधिक रक्कम अधिकृत करण्यात आली आहे. तमिळनाडुने आधीच एक हजार तीनशे वीस आरोग्य आणि कल्याण केंद्रे सुरू केली आहेत हे ऐकून मला आनंद होत आहे.

रोग नियंत्रण आघाडीवर, आम्ही राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देत आहोत. 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. मला हे जाणून आनंद होत आहे की राज्य सरकार टीबी मुक्त चेन्नई उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे आणि 2023पर्यंत राज्यातून टी बी चे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेचे मी कौतुक करतो.

ह्या रोगाचे निराकरण करण्यासाठी राज्यसरकारच्या सर्व प्रयत्नांना पूर्णतः पाठिंबा देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन मी देतो.

आज तामिळनाडू मध्ये 12 टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्रांचे लोकार्पण करताना देखील मला आनंद होत आहे.

हा उपक्रम म्हणजे, आपल्या नागरिकांचे “राहणीमान सुकर” करण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

मी पुन्हा एकदा आश्वासन देतो की, माझे सरकार सार्वत्रिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य सेवेच्या उपक्रमांना बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे.

जय हिंद !!!

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor