Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांशी चर्चा

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांशी चर्चा


तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.

सर्वोच्च न्यायालयाने जल्लीकटूवर घातलेल्या बंदीवरही चर्चा झाली. जल्लीकटूच्या सांस्कृतिक महत्वाबाबत पंतप्रधानांनी कौतुक केले मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.

राज्य सरकारने उचललेल्या सर्व पावलांना केंद्र पाठिंबा देणार आहे.

दुष्काळसदृश स्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिले तसेच केंद्राचे पथक थोड्याच दिवसात पाठवले जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar

B