पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तवांग येथील सशस्त्र सीमा दलाची 5.99 एकर जमीन मेगा फेस्टिवल कम बहुउद्देशीय मैदानाच्या बांधकामासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला हस्तांतरित करायला मंजुरी दिली.
अरुणाचल प्रदेश सरकार ने पार्किंग सुविधा (4.73 एकर )आणि रिंग रोड (1.26 एकर ) सह मेगा फेस्टिवल कम बहुउद्देशीय मैदानाच्या बांधकामासाठी तवांग येथे एसएसबी संकुलातील 5.99 एकर जमिनीची निवड केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने ही 5.99 एकर जमीन हस्तांतरित करण्याची विनंती केली होती.
भारत सरकारने (ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय) मार्च, 2016 मध्येच अरुणाचल प्रदेश मधील तवांग येथे पार्किंग सुविधा आणि योग्य रस्त्यासह मेगा-फेस्टिवल-कम- बहुउद्देशीय मैदानाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या बहुद्देशीय मैदानाचा वापर विविध पर्यटन महोत्सवांच्या आयोजनासाठी केला जाईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor