Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे पंतप्रधानांनी केले चेन्नई विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे पंतप्रधानांनी केले चेन्नई विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे (टप्पा-1) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी या नव्या सुविधेची पाहणीही केली.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः

चेन्नई विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे या शहरातील आणि संपूर्ण तामिळनाडूमधील लोकांना मोठी मदत होईल. या टर्मिनल इमारतीमध्ये तामिळनाडूच्या समृद्ध परंपरेचा गंध अनुभवायला मिळतो.

सुमारे 1260 कोटी रुपये खर्चाने उभारण्यात आलेल्या या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची भर पडल्याने या विमानतळाच्या प्रवासी सेवा क्षमतेमध्ये वार्षिक 23 दशलक्ष प्रवाशांवरून (MPPA) वार्षिक 30 दशलक्ष प्रवासी संख्येपर्यंत (MPPA) वाढ होईल. हे नवे टर्मिनल स्थानिक तामिळ संस्कृतीचे लक्षवेधी प्रतिबिंब असून त्यामध्ये कोलम, साड्या, मंदिरे यांसारखी पारंपरिक वैशिष्ट्ये आणि नैसर्गिक परिसरातील इतर वैशिष्ट्यांचे दर्शन घडत आहे.

या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधानांसोबत तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Patil/Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai