Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान गॅझेट्सची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोरील दीर्घावधी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय : पंतप्रधान


नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025

 

तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान तांत्रिक उपकरणांची (गॅझेट्सची) भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोर अधिकाधिक वेळ घालवण्याचा कल हे  विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय आहेत असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना उद्या ‘परीक्षा पे चर्चा’चा तिसरा भाग पाहण्याचे आवाहन केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘एक्स’वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:

“तंत्रज्ञान….परीक्षेदरम्यान गॅझेट्सची भूमिका…विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोरील दीर्घावधी …

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या या काही सर्वात मोठ्या समस्या आहेत. उद्या, 13 फेब्रुवारी रोजी, @TechnicalGuruji आणि @iRadhikaGupta ‘परीक्षा पे चर्चा’ या भागात या पैलूंवर चर्चा करतील. जरूर पहा. #PPC2025 #ExamWarriors”

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai