Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम स्मारकाचे पंतप्रधानांचे हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11.30 वाजता रामेश्वरममधील पी करुंबू येथील माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन करणार आहेत. डीआरडीओने उभारलेल्या या स्मारकाजवळ पंतप्रधान ध्वजारोहण करतील.

पंतप्रधान डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण करून पुष्पांजली अर्पण करतील. यानंतर पंतप्रधान डॉ. कलाम यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधतील.

यानंतर, पंतप्रधान ‘कलाम संदेश वाहिनी’ या प्रदर्शनी बसला हिरवा कंदील दाखवतील. ती बस देशभरातल्या विविध राज्यांमध्ये प्रवास करून 15 ऑक्टोबर रोजी कलाम यांच्या जयंतीदिनी राष्ट्रपती भवनात पोहोचेल.

पंतप्रधान मोदी यानंतर मंडपम् येथे जनसभेसाठी रवाना होतील. नील क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी पंतप्रधान मंजुरीपत्र प्रदान करतील. अयोध्या ते रामेश्वर या नवीन ट्रेनला हिरवा कंदिल दाखवतील.

पंतप्रधान हरित रामेश्वरम प्रकल्पाची रुपरेषा जारी करतील. मुकुंदरायार छत्तीराम आणि अरिचलमुनाई हा 9.5 किलोमीटरचा जोडरस्ता राष्ट्राला समर्पित करतील. जनसभेला संबोधित करून पंतप्रधानांचा दौरा संपेल.

कलाम स्मारकाची पार्श्वभूमी

डीआरडीओने एका वर्षामध्ये हे स्मारक उभारलं. विविध राष्ट्रीय स्मारकांपासून प्रोत्साहन देऊन या स्मारकाची रचना करण्यात आली आहे. समोरील प्रवेशद्वार इंडिया गेटसारखे असून दोन घुमट राष्ट्रपती भवनासारखे आहेत.

स्मारकामध्ये चार मुख्य सभागृह आहेत जे डॉ. कलाम यांची जीवन आणि कार्यपद्धतीची आठवण करून देतात. सभागृह-1 मध्ये त्यांचे बालपण आणि शैक्षणिक प्रवास, सभागृह-2 मध्ये राष्ट्रपती कार्यकाळ ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र परिषद आणि संसदेमधील भाषणांचा समावेश आहे. सभागृह-3 मध्ये इस्रो आणि डिआरओडीमधील दिवस तर सभागृह 4 मध्ये राष्ट्रपती पदानंतरच्या काळाचे चित्रण करण्यात आले आहे.

डॉ. कलाम यांच्या काही वैयक्तीक गोष्टींसाठी वेगळे दालन आहे. ज्यामध्ये त्यांची प्रसिद्ध रुद्र विणा, सू-30 एमकेआय उड्डाणदरम्यान त्यांनी घातलेला जी सूट आणि त्यांचे विविध पुरस्कार यामध्ये ठेवले आहेत. छायाचित्रं आणि भित्तीचित्रांसाठी 12 भितींचा वापर करण्यात आला आहे.

संपूर्ण परिसरातून डॉ. कलाम यांच्या व्यक्तीत्वाचे सुंदर दर्शन घडून येते.

स्मारकाचे बांधकाम साहित्य आणि इतर वस्तूंचा भारताच्या विविध भागातून रामेश्वमला आणण्यात आला. कलाकुसर केलेला प्रवेशद्वार तांजावूरहून, दगडाचे खांब बंगळुरूहून, मार्बल कर्नाटकातून आणले आहे.

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor