आज १५ ऑक्टोबर, श्रीयुत अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सगळे एकत्र आला आहात. आज डी.आर.डी.ओ. परिसरात त्यांच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. ही गोष्ट खरी आहे की कलाम साहेबांचे आयुष्य इतके व्यापक, विशाल आणि सखोल होते की त्यांचे स्मरण करुन गर्व वाटतो; पण सोबतच एक बोच राहते की ते आपल्या सोबत असते तर ही जी कमतरता जाणवते, ही पूर्ण कशी करणार, हे आपल्यासाठी एक आव्हान आहे आणि मला विश्वास आहे की अब्दुल कलाम यांच्या आशीर्वादाने त्यांनी आपणा देशवासीयांना जी शिक्षण आणि दीक्षा दिली आहे, त्याच्या सहाय्याने आपण ही कमतरता दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करू आणि हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली असेल.
ते राष्ट्रपती झाले, मी समजतो की ते सर्वप्रथम राष्ट्राचे रत्न होते. असे फार कमी होते की एखादी व्यक्ती पहिले राष्ट्र रत्न बनते आणि मग राष्ट्रपती पद स्वीकारते आणि हे त्यांच्या उच्च जीवनाशी निगडीत होते. भारत सरकारने ठरवले आहे की जिथे त्यांचा जन्म झाला आणि जिथे त्यांचे अंतिम संस्कार झाले त्या गावात पुढील पिढयांना प्रेरणा देईल असे स्मारक बनवले जाईल. सरकारने ती जमीन ताब्यात देखील घेतली आहे. मी मंत्र्यांची एक समिती बनविली आहे जी येणाऱ्या काही दिवसात स्मारक कसे बनवावे जे भावी पिढयांना प्रेरणा देत राहील आणि कलाम यांचे जीवन नेहमी आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, याबाबत अंतिम रुप देईल.
दोन गोष्टी ज्या कलाम साहेबांच्या स्वाभाविकपणे दिसतात- एक तर त्यांचे केस. दुरून कोणालाही कळायचे की अब्दुल कलाम येत आहेत. इतर काहीही न बनवता केवळ त्यांचे केस रेखाटले तर कोणीही म्हणेल की हं हा कलामांचा चेहरा असेल. पण आणखी एक गोष्ट होती, जसे त्यांचे केस होते, तसेच त्यांच्या आत एक मुल होते. तर त्यांचे केस आणि त्यांच्यामधलं मुल, या दोन्ही गोष्टी, मला वाटते जे जे त्यांच्या नजिक गेले आहेत त्यांना आठवते. इतकी सहजता, इतकी सरलता.
साधारण वैज्ञानिकांच्या बाबतीत एक विचार असा असतो की ते खूप गंभीर, उदासीन, प्रयोगशाळेत बुडून राहणारे, वर्षभरात कितीवेळा हसले याचाही हिशोब लावावा लागेल. पण कलाम साहेब, दर क्षणाला एक मोठं जिवंत व्यक्तिमत्व दिसत असे. हसत राहणे, धावत राहणे… आणि दोन प्रकारची माणसे असतात, एक जे संधी शोधतात, एक ते जे आव्हाने शोधतात. कलाम साहेब आव्हानांच्या शोधात असायचे. कोणती नवीन आव्हाने आहेत? ते आव्हान कसे स्वीकारावे आणि त्यातून कसे पार व्हावे… हेच त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी असायचे. शेवटपर्यंत!
जेव्हा माझा जवळून संबंध आला… कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते गुजरातला नेहमी यायचे. अहमदाबादविषयी त्यांना विशेष आपुलकी होती, कारण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी तिथूनच केली होती आणि विक्रम साराभाई यांच्या सोबत काम केले होते. त्यामुळे गुजरातबद्दल त्यांना जवळीक होती. माझाही त्यावेळी त्यांच्याशी बराच संबंध यायचा. कच्छचा भूकंप असो किंवा मोठी आपत्ती असो, त्यांचे ते येणं, छोट्या छोट्या गोष्टीतील मार्गदर्शन… आणि त्यावेळी भूकंपाच्या परिस्थितीत पुनर्निर्माणाचे काम करताना विज्ञान-तंत्रज्ञान यांची मदत कशी घ्यावी, जेणेकरून मदत कार्य गतीने होईल, पुनर्वसन गतीने होईल, पुनर्बांधणी गतीने होईल, अशा सर्व गोष्टीत ते मार्गदर्शन करायचे, सहाय्य करायचे.
आयुष्यभर त्यांचे एक वैशिष्ट्य होते आणि कोणीतरी त्यांना विचारले की तुम्हाला कसे आठवणीत ठेवता येईल? त्यांनी उत्तर दिले होते की मला शिक्षकाच्या रुपात लक्षात ठेवावे. हा शिक्षकाचा सन्मान तर आहेच पण सोबतच त्यांच्या आयुष्यातील श्रद्धा काय होती, बांधिलकी काय होती याचीही ही ओळख आहे. त्यांना वाटते की ५-५० लोकांचा समूह नक्की काही करून दाखवू शकतो. पण भारतासारख्या देशाला पिढ्यानपिढ्या पुढे जाण्यासाठी, प्रभाव निर्माण करण्यासाठी गतीने चालायचे आहे तर येणाऱ्या पिढयांना तयार करावे लागेल. हे काम एक शिक्षक करू शकतो आणि हे केवळ त्यांचे शब्द नव्हते, हे त्यांच्या संपूर्ण जीवनात दिसून येते.
राष्ट्रपती पदावरून मुक्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी… ही छोटी गोष्ट नाही… इतक्या मोठ्या पदावर असल्यावर उद्या काय करू, उद्या कसा असेल, उद्यापासून कसे होणार? तुम्हाला माहित आहे अधिकारी निवृत्त झाल्यावर काय होते. म्हणजे आज कुठे उभा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो स्वत:ला कुठे बघतो, तो एक पोकळी अनुभवतो. एकदम असे वाटते की आता जीवनाचा अंत सुरु झाला, असे तो मानायला लागतो. मनात निवृत्ती व्यापायला लागते. कलाम साहेबांचे वैशिष्ट्य पहा की राष्ट्रपती पद, इतक्या मोठ्या पदावरून आदर्श आणि गौरवपूर्ण निवृत्ती. दुसऱ्याच दिवशी विमान पकडून चेन्नईला जाणे, चेन्नईमध्ये वर्गात शिकवायला सुरुवात करणे… हे स्वत:मध्ये असलेल्या बांधिलकीशिवाय शक्य होत नाही. एखादा व्यक्ती आपल्या जीवनाच्या मूळापासून अशी गोष्ट करतो तेव्हा हे शक्य होते आणि आयुष्याचा शेवटही पहा… कुठे रामेश्वरम, कुठे दिल्ली, कुठे जगात जयजयकार आणि पूर्वोत्तर प्रदेश. कोणाला सांगितलं की पूर्वोत्तर राज्यात जा तर म्हणतील अरे साहेब, कुणा दुसऱ्याला पाठवा. पुढच्या वेळी मी जाईन, यावेळी दुसऱ्या कोणालातरी पाठवा. या वयात तिथे जायचे आणि विद्यार्थ्यांसोबत आपले शेवटचे क्षण घालवायचे… त्यांच्यामधलं हे जे सातत्य होते, बांधिलकी होती, त्याला हे प्रतिबिंबीत करते.
भारत बलवान व्हावा, पण केवळ शस्त्रांनी व्हावा ही कलाम साहेबांची इच्छा नव्हती. शस्त्रांचे सामर्थ्य आवश्यक आहे आणि त्यात हलगर्जी दाखवता कामा नये, त्यात जितके योगदान ते देऊ शकतील तेवढे त्यांनी दिले. पण ते असे मानत की देश सीमांनी नाही तर कोट्यावधी लोकांमुळे ओळखला जातो.देशाची ओळख सीमांवर आधारलेली नसते. देशाची ताकद त्या देशाची जनता किती सामर्थ्यशाली आहे यावर होते आणि म्हणून कलाम साहेब या दोन्ही प्रवाहांना एकत्र घेऊन चालत होते. एकीकडे नाविन्यपूर्ण शोध व्हावे, संशोधन व्हावे, संरक्षण क्षेत्रात भारत स्वत:च्या पायावर उभा राहो आणि गरीब तसेच अविकसित देशांसाठीसुध्दा उपकारक ठरो, तिथे भारताने आपली जागा निर्माण करावी आणि दुसरीकडे भारताचा मानव समुदाय संपन्न होवो.
ते शिक्षणाबाबत खूप आग्रही होते. ते नेहमी, योगाचे महत्व समजावत असत आणि त्याचबरोबर त्यांची वचनबद्धता देखील होती. धर्माला अध्यात्मामध्ये बदलायला हवे. अध्यात्माला प्राधान्य द्यायला हवे. ही त्यांची श्रद्धा होती. म्हणजे, एकप्रकारे समाज जीवनात कोणत्या मूल्यांची गरज आहे, त्यावर ते जोर द्यायचे. कदाचित हे मोठ्या धैर्याचे काम आहे, पण ते करायचे. कोणत्याही समारंभात जायचे आणि तिथे विद्यार्थी दिसले की ते खुश व्हायचे. त्यांना वाटायचे की हं, एका अशा बागेत आलोय जिथे फुले उमलणार आहेत. त्यांना लगेच जाणवायचे, एकदम त्यांचा स्वाभाविक बंध तयार व्हायचा आणि अशा समारंभात ते नंतर संकल्प करायला लावायचे. एक एक वाक्य मुलांना म्हणायला लावायचे. आजच्या काळात हे अवघड यासाठी आहे कारण याप्रकारच्या गोष्टी केल्या की दुसऱ्या दिवशी माहित नाही किती वाद निर्माण होतील. पण ते कधी या चिंतेत राहिले नाही. प्रत्येकवेळी त्या संकल्पाचा पुनरुच्चार करत राहिले. आपण जेव्हाही कलाम साहेबांना आठवू, जिथेही कलाम साहेबांची चर्चा होईल, त्या संकल्पांसंदर्भात, त्याला लोकांमध्ये सार्वजनिक पातळीवर सतत कसे आणणार? त्यांचा संकल्प होता, जो आपल्याला सांगितला जातो, त्याचा अंगीकार करणे आपले कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या नवीन पिढीला आपण कसे तयार करूयात? त्या संकल्पाचा वारंवार पुनरुच्चार करत राहुयात की ही परंपरा चालत राहो आणि चेतना जागविण्याचे प्रयत्न निरंतर चालत राहो, त्या दिशेने आपण काय प्रयत्न करावेत?
आज जगात भारत आपले एक विशेष स्थान निर्माण करत आहे. जग कोण्या एके काळी भारताला एका मोठ्या बाजारपेठेच्या रुपात पाहत होते. आज विश्वाने भारताला सहयोगी या रुपात पाहायला सुरुवात केली आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. परंतु केवळ आर्थिक संपन्नता किंवा बाजारच आपल्याला पुढे नेईल का?
येणाऱ्या काळात आपल्याकडे नाविन्यपूर्ण शोधांची खूप शक्यता आहे. आठशे दशलक्ष लोकसंख्या जी 35 वर्षांपेक्षा कमी आहे, ६५ टक्के लोकसंख्या ३५ वयाहून लहान आहे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपण जगात आपली ओळख बनवली त्याचे कारण शोध होते. आपण या शोधांना बळ कसे देऊ शकतो? आपण कलाम साहेबांच्या दर जयंतीला डी.आर.डी.ओ.मध्ये अशी परिषद घेऊ शकतो का? एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस कसेही… यात तरुण वैज्ञानिक असावेत, शोध-संशोधन करणारे लोक असावेत किंवा ज्यांचा स्वभावच वैज्ञानिकाचा आहे अशी मुले असावीत. कधी शालेय विद्यार्थ्यांची एखाद दिवसाची कार्यशाळा असावी, तर कधी पसतीशीच्या आतले तरुण वैज्ञानिक असावेत. त्यांना बोलावून याच विषयांवर परिषद घ्यावी…कलामांना आठवणे म्हणजे नाविन्यपूर्ण शोधांना प्रोत्साहन देणे. ही परंपरा बनू शकते. तर त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एक नवी जबाबदारी घेऊन बाकी समजाला पण सोबत घेत जाऊ आणि हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा समाधानाचा विषय असू शकतो, असे मला वाटते.
जगात, भारताला आता या विषयावर विचार करण्याची गरज आहे की आपण विश्वाला काय देऊ शकतो? आपण काय बनू शकतो? किंवा कोणी आपल्यासाठी काय करू शकते? यातून बाहेर पडून थोडा वेगळा विचार करायला हवा की असा कोणता वारसा आहे, जो आपण विश्वाला देऊ शकतो? जो विश्व सहज स्वीकारू शकेल आणि विश्वाच्या कल्याणासाठी कामी येईल. आपल्याला हळूहळू या पैलूंवर तयारी करायला हवी.
आज संपूर्ण जग सायबर गुन्हेगारीमुळे त्रस्त आहे. काय आपले तरुण असे शोध लावू शकतात ज्यात सायबर सुरक्षेच्या हमीसाठी भारताचा पुढाकार असेल. भारत असा देश असावा जिथे सर्व प्रकारची सायबर सुरक्षा असावी. सीमा सुरक्षा जितकी महत्वाची बनली आहे, तितकीच सायबर सुरक्षा महत्वाची बनली आहे. जग तर कधीही बदलतच आहे, त्यात आपण कसे योगदान देऊ शकतो? आपले शोध, आपले विज्ञान, आपली साधन संपत्ती, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणू शकतील. राहणीमानात काही बदल आणू शकतात. भारत गरीब देश आहे. आपली ही सर्व साधनसंपत्ती, संशोधन हे सर्व गरीबांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी वापरता येतील. आता २०२२पर्यंत आम्ही प्रत्येक गरिबाला घर देण्याचे ठरविले आहे. आता त्यात आम्हाला नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी आणाव्या लागतील. कोणत्या साहित्याने चांगली घरे बनू शकतील, हे संशोधन करावे लागेल. ते कोणते तंत्रज्ञान असेल ज्यामुळे वेगाने घरे बनवता येऊ शकतील. असे कोणते तंत्रज्ञान असेल ज्यामुळे आपण कमी दरातील घरे बनवू शकू. का नसावे? कलाम साहेबांना वाटायचे देशातील शेतकऱ्याचे कल्याण करायचे आहे. असे व्हायचे असेल तर नद्या जोडल्या पाहिजेत. हे केवळ परंपरागत अभियांत्रिकीने होणारे नाही. आपल्याला नवीन शोध हवेत, अनुभव पाहिजेत, अवकाश विज्ञानाची मदत हवी. हे सर्व करून काय आपण लोकांच्या आयुष्यात बदल करू शकतो? हे आपले दैनंदिन आयुष्य आहे, ज्यात आपल्याला बदल घडवून आणायचा आहे.
आजही जगात प्रती हेक्टर जे पिक आहे त्या तुलनेत आपले खूप कमी आहे. आज जगात प्रति किटली जितके दूध मिळते, त्या तुलनेत आपले कमी आहे. अशा कोणत्या वैज्ञानिक पद्धती असाव्यात, कोणता वैज्ञानिक स्वभाव असावा जे शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचेल, पशूपालन करणाऱ्याच्या घरापर्यंत पोहचेल,? ज्यामुळे त्यांच्या जीवनात बदल होईल. यासाठी सामान्य मानवाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विज्ञान कसे लागू करता येईल? त्या तंत्रज्ञानाचा कसा शोध घेऊ शकतो. हे बरोबर आहे की डी.आर.डी.ओ.मध्ये जे लोक आहेत त्यांचे क्षेत्र वेगळे आहे. पण तरीही हा तो समुदाय आहे ज्यांच्या विज्ञान, शोध हे सहज प्रवृत्तीचे भाग आहेत. आपण हळूहळू त्याचा विस्तार करून अब्दुल कलाम यांचे स्मरण करुन आपण देशाला काय देऊ शकतो? आणि हीच ताकद जगाला देण्याची ताकद बनू शकते.
आणि कधीतरी आपण वाचतो, ऐकतो की आपल्याकडे शेतकरी अन्न उगवतो, पण बऱ्याच प्रमाणात ते वाया जाते. काय उपाय असू शकतात? प्रत्येक प्रकारचा उपाय असू शकतो… तात्पुरता का असेना, त्याची काय व्यवस्था होऊ शकते? अशा खूप गोष्टी आहेत, ज्यात आम्ही आमच्या परंपरागत जुन्या पध्दतीतून प्रेरणा घेणे, नवे शोध लावणे आणि त्यातून नवीन साहित्य तयार करणे, व्यवस्था उभी करणे, या गोष्टी करू शकतो; जे विज्ञानाद्वारे समाज जीवनात बदलाचे कारण बनू शकेल, आधार बनू शकेल.
जग ज्या पद्धतीने बदलत आहे, त्यात समूह सुरक्षा मोठा मुद्दा बनत चालला आहे. नील अर्थव्यवस्थेकडे जग वळत आहे. याचा संबंध समुद्री जीवनाशी जोडलेल्या व्यापाराशी देखील आहे, समुद्री शोध-एक मोठे क्षेत्र अपूर्ण पडून आहे. संपदेचा मोठा साठा समुद्री संपत्तीत पडलेला आहे. पण त्याचवेळी मानवी जीवनासमोर आव्हाने आहेत नील नभ, पर्यावरण, हवामान… जगात आज चिंता आणि चर्चेचे विषय आहेत आणि म्हणून नील अर्थव्यवस्था जी समुद्री शक्तीची चिंता करेल आणि नील नभ अबाधित राहो याचीही चिंता करेल. याप्रकारच्या तंत्रज्ञानाचे आपले संशोधन कसे आहे? आपले उत्पादन जेव्हा आपण म्हणतो की शून्य दोष-शून्य परिणाम असे असावे. जागतिक पातळीवर जाताना आपल्या उत्पादनात दोषही नसावा आणि पर्यावरणावर त्याने परिणामही करू नये, असे चित्र असेल तर मला वाटते आपल्या तरुण वैज्ञानिकासमोर आव्हाने आहेत आणि देशातील तरुण वैज्ञानिक, अब्दुल कलाम साहेबांनी जो रस्ता पाल्याला दाखवला, त्यांचे स्वत:चे जीवन म्हणजे सामान्य परिवारातून येऊन येथपर्यंत पोहचले, पण ते ज्या क्षेत्रात गेले तेथेही असेच हाल होते. आता आपण पाहिले रॉकेटचा एक भाग सायकलवर घेऊन जात होते. म्हणजे संस्था पण इतकी गरीब होती. अशा गरीब संस्थेशी जोडले गेले आणि संस्थेलाही मोठे केले. केवळ आपले आयुष्य सुधारून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचले नाहीत तर जिथे गेले त्या संस्थेला मोठे करण्यासाठी भरपूर यशस्वी प्रयत्न केले. हे खूप मोठे योगदान आहे. म्हणजेच आपण जिथे आहोत तिथे नवीन उद्दिष्टे कशी पूर्ण करू शकतो, त्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो?
कलाम साहेबांचे आयुष्य कायम आपल्याला प्रेरणा देत राहील. आणि आपण सर्व आपल्या संकल्प पूर्तीसाठी जीव तोडून प्रयत्न करू. याच अपेक्षेने कलामांना शतश: वंदन करतो आणि त्यांचे जीवन सदासर्वदा आपल्याला प्रेरणा देत राहो या आशेसह खूप खूप शुभेच्छा! अनेक धन्यवाद!
S. Pophale/S.Tupe
Dr. Kalam, before he became a Rashtrapati was a Rashtraratna: PM @narendramodi http://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
Dr.Kalamwas always looking for challenges and how to overcome them: PM @narendramodi http://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
I remember Dr.Kalamwas very fond of Ahmedabad as he was posted there early on during his career, working with Dr.VikramSarabhai: PM
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
Just after leaving the Presidency, after such a big position, he went to teach. This can't happen without an inherent commitment: PM
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
His last moments were spent with students and that too in the Northeast: PM @narendramodi http://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
There is great scope for innovation. India is a youthful nation: PM @narendramodi http://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
Our young scientists should get inspired by the way shown by Dr.Kalam: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 15, 2015
Unveiled a statue of Dr. APJ Abdul Kalam at DRDO Bhavan. pic.twitter.com/h7wWhoLzNf
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2015
A stamp in the honour of the stalwart who left behind a distinct mark on Indian history, through science & service. pic.twitter.com/yLtMjIMVVZ
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2015
A Rashtraratna before a Rashtrapati, always a teacher & builder of great institutions…my speech on Dr. Kalam today. http://t.co/hijuQdr6sp
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2015