Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणारः पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

देशाच्या हरित क्रांतीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे केवळ देशाच्या कृषी क्षेत्रातच परिवर्तन घडून आले नाही,  तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धी देखील सुनिश्चित झाली.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः 

“कृषी आणि शेतकरी कल्याणामध्ये आपल्या कार्याने  दिलेल्या अतिशय मोलाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारत सरकारकडून भारत रत्न प्रदान करण्यात येत असल्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. अतिशय आव्हानात्मक काळात भारताला अन्नधान्य क्षेत्रामध्‍ये  स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आणि भारताच्या शेतीला आधुनिक बनवण्यासाठी असामान्य प्रयत्न केले. एक नवोन्मेषकर्ते आणि मार्गदर्शक म्हणून आणि अनेक विद्यार्थ्यांना अध्ययन आणि संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याची देखील आम्ही दखल घेत आहोत. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे केवळ देशाच्या कृषी क्षेत्रातच परिवर्तन घडून आले नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धी देखील सुनिश्चित झाली. मला अतिशय जवळचे वाटणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते आणि त्यांची दूरदृष्टी आणि सूचना यांचा मी नेहमीच आदर केला.”

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai