मंत्रिमंडळातले माझे सहकारी,
थावरचंद गहलोत जी,
रामविलास पासवान जी,
डॉक्टर हर्षवर्धन जी,
रामदास आठवले जी,
कृष्ण पाल जी,
विजय सांपला जी,
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, भगिनींनो आणि सज्जनहो, सर्वात प्रथम मी देशाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो. या देशाच्या जनतेला आज डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून एक अमूल्य भेट मिळत आहे.
आज बाबासाहेब यांच्या स्मृतिनिमित्त बनवण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्मारकाचे देशाला लोकार्पण करतांना, मी स्वतःला अतिशय भाग्यशाली असल्याचे समजतोय. देशामध्ये सध्या बैसाखी उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव म्हणजे आमच्या अन्नदात्याचा, आमच्या शेतकरी बांधवाच्या परिश्रमाचे पूजन करण्याचा दिवस आहे. या बैसाखी दिनानिमित्त माझ्या देशाला शुभेच्छा!
आजच जालियनवाला बाग नरसंहाराचा स्मृतीदिन आहे. 99 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावत असलेल्या लोकांवर इंग्रज राजवटीने कमालीचा अन्याय केला होता. ही मानवाच्या इतिहासातली सर्वात हृदय विदारक घटनांपैकी एक आहे.
जालियनवाला बाग गोळीबार हत्याकांडातील प्रत्येक हुतात्म्याला मी नमन करतो.
मित्रांनो,
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कितीतरी सरकारे आली. खूप दीर्घ काळ आता उलटला आहे. परंतु जे कार्य याच्या खूप खूप आधी होण्याची आवश्यकता होती, ते आता केले जात आहे. म्हणूनच माझ्यासाठी या स्थानी येणे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे, ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेबांनी आपले अखेरचे दिवस व्यतीत केले, त्या भूमीवर उभे राहण्याचा अनुभव मला अतिशय भावुक करणारा आहे. बाबासाहेब यांच्या नावाने, त्यांच्या स्मरणार्थ या राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. ही प्रकारे देशाच्यावतीने त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंतीच्या आधी एक दिवस या समारंभाचे आयोजन करून आमच्या सरकारने बाबासाहेब यांच्याविषयी असलेल्या अतूट श्रद्धेचे दर्शन दिले आहे.
हे पवित्र कार्य पूर्ण केल्याबद्दल, मी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय त्याचबरोबर भारत सरकारच्या इतर संबंधित विभागांचे अगदी मनापासून कौतुक करतो. या स्मारकाच्या निर्माण कार्यासाठी आपला घाम गाळलेल्या प्रत्येक श्रमिकाला मी नमन करतो. या कामात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अधिकांश लोक आज इथं उपस्थित नसतील. या कार्यक्रमापासून दूर असतील, तरीही मी त्यांना कोटी कोटी प्रमाण करतो.
बंधू आणि भगिनींनो, 26 अलीपूर रस्त्यावर बनलेले हे स्मारक, आता आजपासून केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देशाच्या नकाशावर अगदी कायमचे स्थानांकीत झाले आहे.
लोक या स्मारकामध्ये येवून बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित गोष्टी, त्यांचे विचार, त्यांची दृष्टी याविषयी आणखी चांगल्या पद्धतीने आता जाणून, समजून घेवू शकणार आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
या स्मारकाची रचना एखाद्या ग्रंथाप्रमाणे करण्यात आली आहे. हा ग्रंथ म्हणजे आपल्या देशाची घटना आहे. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर होते.
डॉ.बाबासाहेबांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये कायमस्वरूपी लोकशाही नांदावी, यासाठी या घटनेची रचना करून एक मार्ग दाखवला होता.
आजची नवीन पिढी, ज्यावेळी या स्मारकाला भेट देईल, इथे लावलेले प्रदर्शन बघेल, इथल्या वस्तुसंग्रहालयाची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घेईल, त्यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे त्यांना समजू शकणार आहेत. त्यावरून त्यांचे जीवन कसे अथांग होते, हे सर्वांना जाणवेल.
मित्रांनो,
बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या पाच स्थानांचा ‘पंचतीर्थ’ म्हणून विकास करण्याची संधी आमच्या सरकारला मिळाली, हे आमच्या सरकारच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे.
ही सर्व स्थाने, पंचतीर्थ काही फक्त सिमेंट-विटांच्या इमारती नाहीत. तर या अगदी जीवंत संस्था आहेत. आचार-विचारांच्या दृष्टीने सर्वात मोठी संस्थाने आहेत.
मित्रांनो,
ही भव्य-दिव्य इमारत या सरकारच्या कार्य करण्याच्या संस्कृतीचेही प्रतीक आहे. ज्यावेळी अटलजी यांचे सरकार होते, त्यावेळी या भूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारक निर्माणाचे कार्य करण्याची चर्चा पुढे आली.
परंतु अटलजींचे सरकार गेल्यानंतर आलेल्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये या प्रकल्पाचे काम थांबले होते.
2014 मध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यासाठी 26 अलीपूर रस्त्याची फाईल शोधून काढण्यात आली. फाईलचा शोध लागल्यानंतर मात्र या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले.
21 मार्च, 2016 रोजी या स्मारकाचा शिलान्यास करताना मी म्हणालो होतो, 2018 मध्ये डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीच्या वेळी हे स्मारक लोकार्पण करण्यासाठी मी येणार आहे. समयसीमा, असलेल्या मनुष्य बळावर विश्वास आणि सरकारची इच्छाशक्ती यांच्यामुळे कशाप्रकारे परिवर्तन घडू शकते, याचे दर्शन आज आपल्याला होत आहे.
मित्रांनो,
लोकशाहीमध्ये जनतेने कोणत्याही प्रश्नावर उत्तर मागावे, त्याआधीच आपण स्वतःला उत्तर देण्यास बांधलेले आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला स्वतःला उत्तर द्यायचे असते.
परंतु आपल्याकडे याआधीच्या सरकारांमध्ये असे स्वतःला उत्तर देण्याची जबाबदारी, खूपच कमी होती असे दिसून आले आहे. ही व्यवस्थाच आमच्या सरकारने बदलली आहे. आपल्यापैकी बरेच लोक दिल्लीतल्या 15 जनपथ मार्गावर बनवण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जावून आलेले असणार. 1992 मध्ये या केंद्राची स्थापना करण्याचा विचार पुढे आला होता. परंतु 22 वर्षे या प्रकल्पाची फाईल कुठतरी जणू दाबून ठेवली गेली होती.
दिल्लीमध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर एक वर्षाच्या आतच एप्रिल 2015मध्ये मी या केंद्राचा शिलान्यास केला आणि काही महिन्यांपूर्वीच डिसेंबरमध्ये हे आंतरराष्ट्रीय केंद्र लोकार्पणही केले. आता डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक असलेले हे ‘स्टेट ऑफ द आर्ट इंटरनॅशनल सेंटर‘ दिल्लीची शान बनले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
ज्यावेळी एखाद्या कामाच्या अगदी तळाशी, मुळाशी जावून त्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणून घेतले आणि त्या समस्या सोडवल्या तर संपूर्ण व्यवस्थेचा अशा पद्धतीने कायाकल्प होऊ शकतो.
अगदी तीन दिवसांपूर्वीच मी चंपारण्यमध्ये होतो. तिथून मी मधेपुरा इथल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. या प्रकल्पाचीही अशीच कथा आहे.
या प्रकल्पाला 2007 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्याचे काम 2015मध्ये सुरू झाले. आधीच्या सरकारने प्रकल्पाचे कोणतेही काम केले नाही. अशीच सात वर्षे उलटली. आमच्या सरकारने अवघ्या दोन- अडीच वर्षांमध्ये केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आता या कारखान्यामध्ये जगामधल्या सर्वात शक्तीशाली रेल्वे इंजिनांची निर्मिती होवू शकणार आहे. अशा प्रकारे दीर्घ काळ प्रलंबित राहिलेले आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करून सुरू केलेल्या प्रकल्पांची सूची देवू लागलो तर सकाळ उजडेल, इतकी मोठी ही यादी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणतेही कार्य अडकणे, मूळ ध्येयापासून भटकणे, प्रकल्प लोंबकळत ठेवणे अशी कार्यसंस्कृतीही आपल्याकडे निर्माण होईल, असा किंवा याचा तर डॉक्टर बाबासाहेबांनी कधीच विचार केला नसणार. येणारे सरकार एखाद्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 30 -30, 40-40 वर्षे लावतील, असाही विचार त्यांच्या कधीच मनात आला नसणार. कोणतीही योजना अशा प्रकारे अर्धवट राहते, ते काम लोंबकळत, प्रलंबित ठेवले जाते, हा एकप्रकारे देशाच्या दृष्टीने खूप मोठा अपराधच आहे.
मित्रांनो,
गेल्या चार वर्षांमध्ये आमच्या सरकाने सातत्याने खूप शोध घेवून गेली अनेक वर्षे रखडलेल्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याचा चंगच जणू बांधला आहे.
यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या निरीक्षणाखाली होत असलेल्या आढावा, प्रगती बैठकींच्या माध्यमातून आत्तापर्यंत साडे 9 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्तीच्या अर्धवट प्रकल्पांच्या कामांना वेग देण्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षात झालेल्या या प्रगती बैठकांमुळे देशातल्या विकास कामांना खूप वेग आला आहे.
मित्रांनो,
अभाव आहे याचे रडगाणे गात बसायचे नाही आणि कोणत्याही प्रभावाने विचलित व्हायचे नाही, हा मंत्र प्रत्येकाची ताकद बनू शकतो. ही ताकद देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला त्यांच्या जीवनातूनच दिली आहे. म्हणूनच या सरकारमध्येही आपल्याला अभाव, उणिवा, यांचे रडगाणे कोणी गात आहे, असे दिसणार नाही. आम्ही तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्य बळावर, आमच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जात आहोत. याच विचारांमुळे आम्ही लक्ष्य निर्धारित करतो आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आम्ही स्वतःची संपूर्ण शक्ती पणाला लावणे शिकलो आहोत.
बंधू आणि भगिनींनो,
बरोबर एक महिन्यापूर्वी, इथे दिल्लीतच एक कार्यक्रम झाला होता. संपूर्ण दुनियाभरातून लोक त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये जगातल्या बाकी देशांनी 2030 पर्यंत संपूर्ण विश्वभरातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याच बैठकीमध्ये भारताने घोषणा केली की, क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे काम भारत 2025 पर्यंत पूर्ण करेल. यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
याचा अर्थ आपले लक्ष्य प्राप्त करण्याचा कार्यकाल, हा इतर देशांच्या तुलनेमध्ये 5 वर्षे आणखी कमी आहे.
आता आपणच या गोष्टींचा विचार करा. आधीचे सरकार कोणतेही काम पूर्ण करण्याची तारीख, कालावधी वाढवण्यासाठी, काहीतरी कारणे शोधून काढण्यासाठी आपले डोके लढवत होते. सध्याचे सरकार कोणतेही काम निश्चित केलेल्या वेळेच्या आधी पूर्ण कसे होईल, यावर विश्वास ठेवते. मग यामध्ये दूरच्या, अतिदुर्गम क्षेत्रातल्या गर्भवती आणि नवजात बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम असो, अथवा ग्रामीण भागातले रस्ते जोडण्याची योजना असो, या सरकारने लक्ष्य पूर्ण करण्याची तारीख दोन-दोन, तीन-तीन वर्षांनी कमी केली आहे.
मित्रांनो,
बाबासाहेब यांच्या विचारधारेच्या मुळाशी समानता अनेक रूपांमध्ये दिसून येते.
सन्मानाची समानता,
कायद्यातील समानता,
अधिकारातील समानता,
मानवतेच्या दृष्टीने आदर करण्यासाठी समानता,
संधीमध्ये समानता.
अशा अनेक विषयांवरचे मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये सातत्याने उपस्थित केले. भारत सरकार घटनेचे पालन करताना कोणत्याही पंथामध्ये भेदभाव केला जाणार नाही, अशी आशा त्यांना होती. कोणत्याही जातीभेदाशिवाय सर्वांना समान अधिकार, हक्क मिळावेत, असे त्यांना वाटत होते. तसे त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलं होतं. भारतामध्ये कोणत्याही जातीभेदाविना सरकार चालवले जाईल आणि घटनेचे पालन करताना कोणत्याही प्रकारे जाती, पंथ यामध्ये भेद केला जाणार नाही. कसल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आंबेडकर यांना अपेक्षित होते. आज आमचे सरकार प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करताना सामाजिक न्यायाचा विचार प्राधान्याने करते. आणि कोणताही भेदभाव आमचे सरकार करीत नाही. सर्वांना समानतेचा अधिकार देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे दिसून येईल. अनेक दशकांपासून देशामध्ये जो असमतोलपणा निर्माण झाला होता, तो या सरकारने सुरू केलेल्या योजनांमुळे संपुष्टात आणण्याचे काम होत आहे. योजनांच्या माध्यमातून आमचे सरकार असमतोल समाप्त करण्याचे काम करीत आहे.
याचे उदाहरण म्हणजे, जनधन योजना, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाल्यानंतरही कोट्यवधी लोकांचे बँकेमध्ये साधे खातेही नव्हते. हा एक प्रकारे खूप मोठा सामाजिक अन्याय होता. हा अन्याय संपुष्टात आणण्याचे काम आम्ही केले आहे. जनधन योजनेतून आत्तापर्यंत देशामध्ये 31 कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. याच प्रकारे देशातल्या कोट्यवधी घरांमध्ये शौचालय नसणे हा सुद्धा सामाजिक अन्यायाचा एक भागच आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत, आमच्या सरकारने देशभरामध्ये 7 कोटी शौचालयांची निर्मिती केली. यापैकी 2 कोटी शौचालये ग्रामीण भागामध्ये बांधण्यात आली आहेत. या योजनेतून दलित आणि आदिवासीयांच्या घरांमध्येही शौचालये बांधण्यात आली. शौचालय बनवल्यानंतर कशा प्रकारे सन्मान दिला जातो आणि यामधून समानतेची भावनाही कशी निर्माण होते, हे गेल्या चार वर्षांमध्ये देशाने पाहिले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज या आधुनिक काळामध्ये एखाद्याच्या घरी वीज नाही, ही सुद्धा खूप मोठा सामाजिक अन्याय करणारी गोष्ट आहे. आमच्याकडे 2014 मध्ये 18 हजारपेक्षा जास्त गावांमध्ये अद्याप विद्युत पुरवठाच होत नव्हता. तिथले लोक जणू 18 व्या शतकामध्ये जगत होते. आमच्या सरकारने लाल किल्यावरून घोषणा केली आणि या गावांमध्ये वीज पोहोचवण्याचा निर्धार केला. आम्ही आमची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याचे काम चोख पार पाडत आहोत. आत्तापर्यंत 16 हजार गावांमधला अंधार दूर झाला आहे. या गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम आम्ही पूर्ण केले आहे.
आता तर आम्ही अगदी प्रत्येक घराला वीजजोडणी देण्याचे भगीरथ काम सुरू केले आहे.
पंतप्रधान सौभाग्य योजनेच्या माध्यमातून देशातल्या 4 कोटी घरांमध्ये मोफत वीज दिली जात आहे. ज्यावेळी घरांमधला अंधार दूर होईल, त्याचवेळी संपूर्ण समाजामध्ये प्रकाश पसरणार आहे. स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली. या योजनेमुळे गेली अनेक दशकांपासून होणारा अन्याय संपुष्टात आणण्याचे काम होत आहे.
बँकांकडून कर्ज फक्त मोठ-मोठ्या योजनांसाठी आणि त्या बनवत असलेल्या लोकांनाच मिळावे असे का? आपल्या पायावर उभे राहण्यासाठी स्वबळावर काही करून दाखवण्याचे स्वप्न पाहत असलेल्या नवयुवकाला बँक हमीसाठी भटकावे लागत होते. ही स्थिती बरोबर नाही. आमच्या सरकारने कोणत्याही तारणहमीशिवाय कर्ज मिळण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. मुद्रा योजनेतून आत्तापर्यंत 12 कोटींपेक्षा जास्त कर्जप्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये स्वरोजगार निर्मितीसाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. मुद्रा योजनेचा 2 कोटी 16 लाख पेक्षा जास्त दलित लाभार्थींना फायदा झाला आहे.
मित्रांनो,
या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आणखी एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. संपूर्ण जगामध्ये या योजनेची चर्चा सध्या होत आहे. ही योजना म्हणजे सामाजिक असमतोल दूर करण्याच्या दिशेने आमच्या सरकारने उचललेले एक अतिशय महत्वाचे आणि मोठे पावूल आहे. या योजनेचे नाव आहे, ‘आयुष्मान भारत‘. या योजनेअंतर्गत देशभरातल्या जवळपास 11 कोटी गरीब कुटुंबांना म्हणजे जवळपास 45 ते 50 कोटी लोकांना आरोग्य विमा सरकार देणार आहे. गरीब कुटुंबामध्ये जर कोणी आजारी पडले, तर त्याचा 5लाखापर्यंतचा सर्व खर्च या आरोग्य विम्यातून करण्यात येणार आहे.
मित्रांनो,
आज देशाच्या कोणत्याही कानाकोप-यामध्ये तुम्ही जा, त्या ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये आज सर्वात जास्त चर्चा कोणत्या योजनेची होते, ती म्हणजे, उज्ज्वला योजना. अनेक दशकांपासून आपल्या गावांमधल्या अगदी मोजक्या घरांमध्येच स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन असायचे. गॅस कनेक्शन आहे, यावरून त्या घरांची वेगळी ओळखही असायची. ज्या घरांमध्ये गॅस नाही, ते एकप्रकारे सामाजिक अन्यायाचे उदाहरणच होते. उज्ज्वला योजनेतून आमच्या सरकारने हा सामाजिक अन्याय दूर करण्याचे काम केले. सरकारने साडे तीन कोटींपेक्षा जास्त मोफत गॅस कनेक्शन दिले. आता या योजनेचे लक्ष्य वाढवून 8 कोटी करण्यात आले आहे. मला वाटते की, गेल्या काही दशकांतील योजनांची तुलना केली तर, सामाजिक न्याय स्थापित करणारी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे.
मित्रांनो,
या सरकारने कायद्याच्या माध्यमातून सामाजिक समतोल निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आमच्याच सरकारने 2015मध्ये दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायदा अधिक कठोर केला आहे.
दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या सूचीमध्ये आधी 22 वेगवेगळे गुन्हे होते, त्यामध्ये आता वाढ करून 47 गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ आता दलितांच्या विरोधात वेगवेगळ्या 47 अपराध्यांवर कायदेशीर कारवाई केली जावू शकते. मित्रांनो, ज्यावेळी आमच्या सरकारने यासंबंधी कायद्यामध्ये सुधारणा केली, त्यावेळी आरोपीला हंगामी जामिन दिला जाणार नाही, अशी तरतूद होती. आणि ही तरतूद होती तशीच कायम ठेवण्यात आली आहे. पीडितांना मिळणारी भरपाईची रक्कम आमच्या सरकारने वाढवली आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जावी, यासाठी आमच्या सरकारने आधीच्या सरकारच्या दुप्पटीपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. ज्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने 20 मार्चला या अधिनियमाशी संबंधित निर्णय दिला, त्यावेळी केवळ 12 दिवसांमध्ये फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली.
मी आज, याप्रसंगी देशाला आश्वस्त करू इच्छितो की, जो कायदा आमच्या सरकारने अधिक कठोर केला आहे, त्यावर कोणताही प्रभाव पडू दिला जाणार नाही. काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीसमोर आत्मसमर्पण करत असलेल्या लोकांच्या, दलांच्या जाळ्यामध्ये आपण कोणीही फसू नये, असा माझा लोकांना आग्रह आहे.
मित्रांनो,
माझ्या दलित बंधू-भगिनींनो, मागास-आदिवासींच्या सन्मानासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.
मागासवर्गीय, आदिवासी यांच्यावरील अत्याचाराशी संबंधित प्रकरणांची वेगाने सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येत आहे. सरकारने मागास जातींच्या उप-प्रकारांसाठी एक आयोग नियुक्त करण्याचा निर्णयही घेतला आहे. सरकारला वाटते की, इतर मागास वर्गीय समुदायामध्ये जे अतिशय मागास आहेत, त्यांच्यासाठी सरकार आणि शिक्षण संस्थांमध्ये विशिष्ट निहीत मर्यादेत राहून आरक्षणाचा आणखी जास्त लाभ मिळावा. यासाठी इतर मागास वर्गीय समुदायामध्ये उप-वर्ग बनवण्यासाठी एक आयोग बनवण्यात आला आहे.
मित्रांनो,
याआधी 6 लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणारे कर्मचारी ‘क्रिमी लेयर‘च्या वर्गात येत होते. सरकारने ही मर्यादा वाढवून आता 8 लाख प्रतिवर्ष केली आहे. याचा अर्थ आता मागास वर्गातले आणखी जास्त लोक या इतर मागास वर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेवू शकत आहेत. याआधी सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गामध्ये ‘क्रिमी लेयर’मध्ये समानता नव्हती. ही असमानता संपुष्टात आणण्याची मागणी गेल्या 24 वर्षांपासून होत होती. आमच्या सरकारने काही महिन्यांपूर्वीच ही असमानता संपवली आहे. केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर दलित- मागासवर्गींयांसाठी आरक्षित असलेली पदे तातडीने भरण्याचे काम आम्ही केले आहे.
मित्रांनो,
सामाजिक अधिकार ही गोष्ट आमच्या सरकारसाठी फक्त बोलण्याची आणि ऐकण्याची बाब नाही. तर आमची कटिबद्धता आहे.
ज्या ‘नव भारता’ची चर्चा मी करतो, तो भारत बाबासाहेब यांच्या स्वप्नातला भारत आहे. डॉक्टर आंबेडकर यांची 125 वी जयंती देश -विदेशामध्ये अतिशय मोठ्याप्रमाणावर साजरी झाली. यानिमित्त विशेष टपाल तिकीट आणि नाणेही काढण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब यांच्यासंबंधी माहिती देणारा चित्ररथ तयार करण्यात आला. अमेरिका आणि ब्रिटन इथे बाबासाहेबांनी शिक्षण घेतेले होते. त्या ठिकाणी अनेक शिकणा-या मुलांना पाठवण्यात आले.
सरकारने असे ऐतिहासिक निर्णय घेवून ज्यादिवशी घटना स्वीकारण्यात आली, तो दि.26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून घोषित केला आणि पहिल्यांदाच संसदेमध्ये दोन दिवस घटनेवर चर्चाही करण्यात आली.
बंधू आणि भगिनींनो,
मी आज देशाच्या लोकांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बाबासाहेब यांची सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिर्माणाच्या पवित्र यज्ञामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदयामध्ये ते निवास करीत आहेत.
नाहीतर काँग्रेसने संपूर्ण शक्तीनिशी त्यांचे देशाच्या इतिहासातून नामोनिशाण मिटवण्याचा चंगच बांधला होता. इतिहासामधले हे कटू सत्य आहे. ज्यावेळी बाबासाहेब जिवंत होते, त्यावेळीही काँग्रेसने त्यांचा अपमान करण्यामध्ये कसलीही कसर बाकी ठेवली नाही.
म्हणूनच बंधू आणि भगिनींनो,
काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यातील संबंध तुटण्याच्या अखेरचा तो काळ होता. त्या काळाविषयी मी आपल्याशी अगदी विस्ताराने बोलू इच्छितो. काँग्रेसचा नेमका आणि खरा चेहरा कसा आहे, हे समोर आणण्यासाठी ही चर्चा इथे करण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो,
अनेक वाद-विवादांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूजींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. आपण का राजीनामा दिला हे स्पष्ट करताना बाबासाहेबांनी एक- एक करत आपल्याला होत असलेल्या, झालेल्या त्रासांची माहिती दिली होती.
मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला आहे, याची सर्व कारणेही त्यांनी अगदी विस्ताराने दिली होती. त्यांनी दिलेल्या या माहितीमधील काही ओळींविषयी मी आपल्याला सांगू इच्छित आहे.
हे सगळे सांगणे यासाठी महत्वपूर्ण आहे की, त्यामुळे देशभरातील दलित समाज, देशभरामधील आदिवासी, मागास समाज, भारताचा प्रत्येक नागरिक अशा सर्वांना हे माहीत झाले पाहिजे. देशामध्ये आणीबाणी जारी करणा-या काँग्रेस पक्षाने या देशाची घटना निर्मिती करणा-या महान व्यक्तीबरोबर कसे वर्तन केले होते. हे सर्वांना समजलेच पाहिजे.
मित्रांनो, बाबासाहेब यांनी लिहिले होते-
“मला मंत्रिमंडळाच्या कोणत्याही समितीमध्ये घेतले नाही.
परराष्ट्र व्यवहारविषयक समितीमध्येही घेतले नाही.
संरक्षण समितीमध्येही नाही घेतले.
ज्यावेळी आर्थिक व्यवहारविषयक समिती बनवण्यात येत होती, त्यावेळी मला वाटले की, त्यामध्ये मला नक्कीच समाविष्ट करून घेतले जाईल. कारण मी अर्थशास्त्र आणि वित्तीय विषयांचा विद्यार्थी आहे. परंतु मला त्या समितीमध्येही घेण्यात आले नाही.”
बाबासाहेब यांच्याविषयी काँग्रेस पक्ष काय विचार करीत होता, त्या विचारांमधील ही सत्यता 70 वर्षांपूर्वीची आहे.
ज्या व्यक्तीने जगभरातील एकापेक्षा एक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये अध्ययन केले आहे, अशा व्यक्तीचा काँग्रेसमध्ये पदोपदी, क्षणोक्षणी अपमान केला गेला.
स्वतः बाबासाहेबांनी सांगितले आहे की, त्यांना फक्त एक मंत्रालय देण्यात आले, त्यामध्ये काही जास्त काम नव्हते. योजना तयार करण्याच्या कामात सहभागी झाले असते, तर ज्या विषयांमध्ये ते तज्ज्ञ होते, त्यांच्या अभ्यासाचा, ज्ञानाचा फायदा देशाला त्यांनी करून दिला असता. परंतु काँग्रेसने त्यांना या सगळ्यांपासून अगदी दूर ठेवले. इतकेच नाही तर, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी इतर कोणत्याही मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारीही बाबासाहेब यांच्याकडे सोपवण्यात आली नाही.
मित्रांनो,
बाबासाहेब यांनी आपला राजीनामा दिला, त्यामागे आणखी एक खूप मोठे कारण होते. देशातील दलितांबरोबर, देशातील मागास समाजाबरोबर काँग्रेस पक्षाकडून कसा व्यवहार होत आहे, हे पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर बाबासाहेब यांनी लिहिले होते की –
“सरकारविषयी माझा मोहभंग झाला आहे, याचे आता मी आपल्याला कारण सांगू इच्छितो. हे कारण म्हणजे, मागास आणि दलित यांच्याबरोबर काँग्रेस ज्या पद्धतीने वर्तन करते, त्याच्याशी याचा संबंध आहे.
घटनेमध्ये मागास जातींच्या हिताच्या संरक्षणासाठी योग्य तरतूद नाही, याचा मला खेद वाटतो. हे कार्य एका आयोगाच्या शिफारसींच्या आधारे करण्यात येणार होते.
घटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होवून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु सरकारने अद्याप आयोग नियुक्त करण्याविषयी काहीही विचारसुद्धा केलेला नाही.”
मित्रांनो,
त्या काळापासून आजपर्यंत काँग्रेसच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 70 वर्षांपूर्वी मागास जातींसाठी आयोग नियुक्त करण्याची चर्चा काँग्रेसने कधीही पुढे केलीच नाही. आणि करूही दिली नाही. इतकंच नाही, तर काँग्रेसच्या या धोरणांमुळे बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला.
आज 70 वर्षांनंतरही काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इतर मागास वर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे काम कसे रोखून धरता येईल, याचाच विचार काँग्रेस करीत आहे. इतर मागास वर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिल्यानंतर या आयोगालाही मागास जाती, मागास जनजाती आयोगाप्रमाणे बळ मिळू शकणार आहे. परंतु काँग्रेस यामध्येही अडकाठी आणण्याचे काम करीत आहे.
मित्रांनो,
आज आपणा सर्वांना बाबासाहेब यांचे राजीनामा प्रकरण अगदी विस्ताराने सांगितले. याचे कारण म्हणजे, काँग्रेसच्या वतीने समाजामध्ये भ्रम निर्माण केला गेला आहे की, त्यांनीच बाबासाहेबांना देशाचे कायदा मंत्री बनवले होते.असा हा भ्रम आहे.
कायदा मंत्री बनवल्यानंतर काँग्रेसने बाबासाहेबांबरोबर जो व्यवहार केला, तो प्रत्येक भारतीयाला माहिती झाला पाहिजे. कारण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने ‘इकोसिस्टिम’च अशी काही बनवली की, त्यामुळे देशाचा इतिहास फक्त आणि फक्त एकाच परिवाराच्या अवती-भवतीपर्यंत सीमित राहिला गेला.
ज्यांनी काँग्रेसच्या या “इकोसिस्टिम”च्या पुढे मान तुकवली नाही, त्यांना पुस्तकांमध्येही जागा मिळाली नाही.
मित्रांनो,
1951 मध्ये मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेबांनी 1952 मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्याविरूद्ध आपला उमेदवार केवळ उभाच केला नाही, तर बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी स्वतः नेहरूजी गेले होते. काँग्रेसने आपली संपूर्ण शक्ती या मतदारसंघात लावली होती, त्यामुळे बाबासाहेब यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर त्यांनी 1953 मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला. आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना लोकसभेत जाण्यापासून काँग्रेसनेच रोखले. या सातत्याने होत असलेल्या अपमानाच्या काळात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बाबासाहेबांना साथ दिली. मुखर्जी यांच्या प्रयत्नांमुळे बाबासाहेब राज्यसभेमध्ये पोहोचले.
मित्रांनो,
मी काँग्रेसला आव्हान देतो,
त्यांनी बाबासाहेब यांच्यासाठी केलेले एक तरी काम सांगावे.
बाबासाहेबांना सन्मान देण्यासाठी त्यांनी केलेले एक तरी काम सांगावे.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्याला आणि मलाही माहीत आहे की, काँग्रेसकडे यावर कोणतेही उत्तर नाही. उत्तरादाखल काँग्रेस पक्ष फक्त खोटे बोलू शकतो. वास्तविक सत्य असे आहे की, बाबासाहेबांच्या निधनानंतर काँग्रेसने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात त्यांच्या योगदानाचे महत्व संपुष्टात आणण्याचाही प्रयत्न केला गेला. नेहरूजींपासून ते राजीव गांधी यांच्यापर्यंत काँग्रेसच्या तमाम नेत्यांना “भारत रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु त्यांना बाबासाहेब भारताचे रत्न आहेत, असे कधीच वाटले नाहीत.
ज्यावेळी व्ही.पी.सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले, त्यावेळी अटलजी आणि आडवाणीजी यांनी त्यांना डॉक्टर बाबासाहेब यांना “भारत रत्न” देण्याचा आग्रह केला.
भाजपाच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये बाबासाहेब यांचे चित्र लावू शकले.
मध्यवर्ती सभागृहामध्ये आता जागा नाही, असे सांगून बाबासाहेबाचे चित्र लावणे काँग्रेसकडून टाळले जात होते.
जरा विचार करा, ज्या व्यक्तीने मध्यवर्ती सभागृहामध्ये बसून घटनेची निर्मिती केली, त्यातील अनेक गोष्टींवर अतिशय बारकाईने अनेक तास चर्चा केली आहे, त्याच व्यक्तीचे चित्र लावण्यासाठी जागा नाही, हे कारण काँग्रेसला द्यावेसे का वाटले?
बंधू आणि भगिनींनो,
90च्या दशकामध्ये देशामध्ये मागास आणि दलितांच्या अधिकारांवर राष्ट्रव्यापी चर्चा सुरू झाली नसती, तर आजही काँग्रेसकडून बाबासाहेब यांच्याविषयीचा व्देष सार्वजनिक स्तरावर दर्शवला असता, हे मी अगदी दाव्यानिशी सांगतोय.
काँग्रेसला बाबासाहेब यांच्या नावावर मतांची बँक दिसते. सत्ता नजरेसमोर येते. आता नाइलाज झाल्यामुळे दिखावा करण्यासाठी त्यांचे नाव काँग्रेसला घ्यावे लागतेय.
काँग्रेसला आपल्या इतिहासामध्ये बाबासाहेबांचे नाव घ्यावे लागते, ही त्यांच्या दृष्टीने एक सर्वात मोठी नाइलाजाची गोष्ट आहे, हे मी समजू शकतो.
हे बाबासाहेबांच्या महान कर्मांचे, देशासाठी त्यांनी केलेल्या सेवेचे फळ आहे, की एका परिवाराची पूजा करत असलेले लोक, त्याच परिवाराला देशाचे भाग्यविधाता समजणारे लोक आता मनावर दगड ठेवून बाबासाहेबांचे नाव घेवू लागले आहेत.
परंतु मला चांगले माहीत आहे की, काँग्रेस अशा गोष्टीही कधी करणार नाही. काँग्रेस फक्त भ्रम निर्माण करण्याचे काम करू शकते. दिलत, आदिवासी, मागास वर्गियांशी खोटे बोलू शकते. त्यांच्यामध्ये अफवा पसरवू शकते. त्यांच्या या प्रयत्नांचा अनुभव आपण सर्वांनीच या महिन्याच्या दोन तारखेलाच घेतला आहे. कधी आरक्षण संपवण्यात येणार आहे, अशी अफवा पसरवायची, तर कधी दलितांवरील अत्याचारांशी संबंधित कायदा रद्द करण्यात येणार आहे, अशी अफवा पसरवायची. भावा-भावांमध्ये लढाई घडवून आणण्यामध्ये काँग्रेस कधीही कोणतीच कसर सोडली नाही.
मित्रांनो,
दलित आणि मागास वर्गांचा विकास व्हावा आणि ते मुख्य प्रवाहामध्ये यावेत, असं काँग्रेसला कधीच वाटले नाही, आजही वाटत नाही.
याउलट आमचे सरकार, बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरुन जात आहे. “सबका साथ – सबका विकास” हा मंत्र घेवून आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला, सर्व वर्गाला कसा फायदा मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहोत.
कोणताही राजकीय पक्ष आणि व्यक्ती जो अगदी प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या नामाची माळ जपतो, त्यांच्याविषयी आस्था बाळगतो, तो कधीच काँग्रेसबरोबर जावू शकणार नाही.
मित्रांनो,
मी जर गरीब आणि मागास परिवारामध्ये जन्माला आलो नसतो तर, बाबासाहेबांना इतक्या चांगल्या पद्धतीने समजू शकलो नसतो. मी गरीबी काय असते ते पाहिले आहे. जातीवरून अपशब्दही मी ऐकले आहेत. उपरोधिक बोलणे मी ऐकले आहे. आणि म्हणूनच माझ्यासारख्या माणसालाच हे सहजपणाने समजू शकते की, बाबासाहेबांनी आपल्या काळामध्ये काय काय सहन केले असेल. बाबासाहेबांच्या प्रेरणेतूनच उद्यापासून,म्हणजे त्यांच्या जयंतीपासून देशामध्ये ग्राम स्वराज अभियानाचा प्रारंभ करण्यात येत आहे. मी स्वतः छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये जाणार आहे. उद्यापासून देशामध्ये क्षेत्रीय विकासामध्ये असलेला असमतोल, आरोग्य सेवेमध्ये असलेला असमतोल संपुष्टात आणण्यासाठी एक नवीन आध्याय सुरू करण्यात येणार आहे.
मित्रांनो,
सामाजिक न्याय हा विषय या सरकारसाठी काही फक्त बोलण्या-ऐकण्याचा विषय नाही. तर ती एक कटिबद्धता आहे. परंतु ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात आम्ही पाहिल्या आहेत, त्या घटनांमुळे सामाजिक न्यायाच्या मूळ धारणेला आव्हान दिले जात आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ज्या घटनांची चर्चा होत आहे, त्या निश्चितपणे कोणत्याही सभ्य समाजाच्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद आहेत. आमच्या स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य या देशाच्या भविष्यासाठी बलिदान केले आहे, हा तर त्यांच्या बलिदानाचा अपमान आहे.
एका समाजाच्या रूपाने, एका देशाच्या रूपाने आपल्या सगळ्यांची मान या घटनांमुळे शरमेने खाली गेली आहे. देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये होणाऱ्या या निंद्यनीय घटना, आमच्या मानवीय संवेदना थिजवून टाकतात. मी देशाला विश्वास देवू इच्छितो की, यातील जे कोणी गुन्हेगार असतील, ते वाचणार नाहीत. न्याय होणार आणि पूर्ण न्याय होणार. आमच्या समाजामध्ये असलेली ही वाईट प्रवृत्ती संपुष्टात आणण्याचे काम, आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे.
मी तर लाल किल्ल्यावरून बोलण्याचे धाडस केले होते की, मुलींना नाही तर मुलांना विचारा. आपल्याला कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक मूल्ये यांच्यापासून ते न्याय व्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी यासाठी अधिक बळकट करण्याची गरज आहे.
त्याचवेळी आम्ही बाबासाहेब यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू शकणार आहे. नव भारत बनवू शकणार आहे.
बाबासाहेब यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम रहावा, त्यांचे विचार आपल्याला निरंतर प्रेरणा देत राहतील, अशी भावना व्यक्त करून मी आपले बोलणं समाप्त करतो.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, देशाच्या सर्व लोकांना, डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद !!!
B.Gokhale/ S.Bedekar/P.Malandkar
26, अलीपुर रोड पर बना यह स्मारक देश के मानचित्र पर हमेशा के लिए अंकित हो गया है। pic.twitter.com/CLGo3WqV7D
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
हमारी सरकार का बड़ा सौभाग्य रहा है कि हमें पूज्य बाबासाहेब से जुड़े हुए 5 स्थानों को पंचतीर्थ के रूप में विकसित करने का अवसर मिला। ये स्थान, ये तीर्थ सिर्फ ईंट-गारे की इमारत भर नहीं हैं, बल्कि ये जीवंत संस्थाएं हैं, प्रेरणा के स्रोत हैं। pic.twitter.com/MSZ3bxp08M
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
पूज्य बाबासाहेब के विचारों का मूल तत्व है - समानता। हमारी सरकार की प्रत्येक योजना में सामाजिक न्याय और बिना किसी भेदभाव के सभी को समानता का अधिकार देने का प्रयास दिखेगा। pic.twitter.com/OEWTZydZeq
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
दलित, पिछड़े और आदिवासी भाइयों-बहनों के सम्मान के लिए हम पूरी तरह प्रतिबद्ध हैं। pic.twitter.com/MsxYOSbIL7
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
आज के युवाओं को जानना आवश्यक है कि किस तरह कांग्रेस ने पूज्य बाबासाहेब को हर समय अपमानित किया! pic.twitter.com/ZeIR6SsntW
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
आज भी कांग्रेस नहीं बदली। वो बाबासाहेब को अपमानित करती रहती है।
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
ओबीसी कमीशन के मामले में कांग्रेस का नकारात्मक रुख सब जानते हैं। pic.twitter.com/U2Fzd4IaDU
एक नहीं, दो बार कांग्रेस ने पूज्य बाबासाहेब को चुनाव में हराया।
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
उस समय अगर कोई पूज्य बाबासाहेब के साथ डटकर खड़े रहे तो वे थे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी और जनसंघ। pic.twitter.com/sjxXBWkGVb
पूज्य बाबासाहेब के महापरिनिर्वाण के बाद कांग्रेस ने राष्ट्र निर्माण में उनके योगदान को भी मिटाने की कोशिश की।
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
भाजपा के प्रयासों के कारण उनकी तस्वीर सेंट्रल हॉल में लगाई गई, उन्हें भारत रत्न से सम्मानित किया गया। pic.twitter.com/9kCuBQbm2k
सबका साथ, सबका विकास के मंत्र के साथ हम बाबासाहेब की दिखाई राह पर चलते रहेंगे। pic.twitter.com/mdCnPvQVwg
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018
Honoured to inaugurate the Dr. Ambedkar National Memorial at 26, Alipur Road in Delhi. Sharing my speech on the occasion. https://t.co/SEi55s07DQ pic.twitter.com/qNXBWXDbAW
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2018