डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज अर्थात संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय वेलिंग्टन आणि डिफेन्स सर्व्हिस कमांड अँड स्टाफ कॉलेज मीरपूर यांच्यातल्या धोरणात्मक आणि कार्यात्मक अभ्यास विषयक लष्करी शिक्षण सहकार्य सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली. यामुळे धोरणात्मक आणि कार्यात्मक अभ्यास विषयक लष्करी शिक्षण क्षेत्रात सहकार्य वृद्धीसाठी चौकट निर्माण होण्यासाठी मदत होण्याबरोबरच उभय देशात दीर्घकालीन सहकार्यही वाढीला लागणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha