Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टांझानिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

टांझानिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहीम राष्ट्रपती जॉन मागुफुली,

माध्यमांचे प्रतिनिधी,

धन्यवाद, महामहीम, तुमच्या स्वागतपर भाषणाबद्दल

माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचे तुम्ही भव्य आदरातिथ्य केल्याबद्दल मी देखील तुमचा आभारी आहे.

आज, चार आफ्रिकी देशांच्या माझ्या दौऱ्याच्या चौथ्या दिवशी दार-ए-सलाम सारख्या जिवंत शहरात आल्यावर मला अतिशय आनंद होत आहे. महामहीम, तुम्ही आता आपल्या संबंधांचे सामर्थ्य आणि भविष्यातील संधी याबाबत जे बोललात, त्याच्याशी मी सहमत आहे.

मित्रांनो,

आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी आणि विशेषत: टांझानियाचे भारताशी दृढ संबंध आहेत. आम्ही खूप जुने सागरी शेजारी आहोत. आमच्या नेत्यांनी आणि आमच्या जनतेने एकत्रितपणे वसाहतवाद आणि जातीय दडपशाहीविरुद्ध लढा दिला.

19 व्या शतकापासून आपले व्यापारी व्यापार करत आहेत आणि हिंद महासागराच्या मोठ्या पट्टयाने आपला समाज आणि आपली जनता यांना जोडलेले आहे.

मित्रांनो,

मी राष्ट्रपती मागुफुली यांचे मनापासून आभार मानतो कारण मी रविवारी दौरा करण्यासाठी ते राजी झाले. त्‍यांच्या ‘हपा काझी तु’ म्हणून येथे फक्त काम या ब्रीदवाक्याला ही मानवंदना आहे. राष्ट्रपती मागुफुली यांच्याकडे राष्ट्र निर्माण, विकास आणि औद्योगिकीकरणासाठी दूरदृष्टी आहे, जी माझे माझ्या देशासाठी पाहिलेले स्वप्न आहे.

मित्रांनो,

भारत हा टांझानियाचा आर्थिक भागीदार आहेच. आमचे आर्थिक संबंध मजबूत आहेत आणि नवीन उंची गाठत राहतील.

आमचा द्विपक्षीय वार्षिक व्यापार अंदाजे 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.

टांझानियामधील भारताची गुंतवणूक सुमारे 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.

टांझानियामधील भारतीय उद्योग यापुढेही वाढतील आणि विस्तार होत राहील.

टांझानियाच्या विकास गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू भागीदार बनणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

आज, राष्ट्रपती मागुफुली आणि मी आमच्या भागीदारीच्या अनेक आयामांबाबत सविस्तरपणे बोललो.

सहकार्याचा कृतीशील कार्यक्रम तयार करण्यावर आमचा भर होता, जेणेकरून आपण शक्यतांबाबत कमी बोलू आणि प्रत्यक्षात काम साध्य केले याबाबत अधिक बोलू.

आपल्या समाजाच्या आर्थिक समृध्दींसंबंधी आपली समान इच्छा आपले सहकार्य विस्तारण्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहेत याबाबत आपले एकमत आहे.

यासाठी, आम्हा दोघांना पुढील गोष्टी करणे गरजेचे वाटते:-

एक, कृषी आणि अन्नसुरक्षा या क्षेत्रातील आपली भागीदारी मजबूत करणे, यामध्ये टांझानियामधून भारतात डाळींची वाढती निर्यात समाविष्ट आहे.

दोन, विकास आणि नैसर्गिक वायूच्या वापरासाठी एकत्रितपणे काम करणे.

तीन, टांझानियामध्ये औद्योगिक अर्थव्यवस्था, क्षमता आणि संस्था निर्मितीमध्ये भागीदारी आणि

चार, उद्योगांचे उद्योगांशी असलेल्या थेट संबंधांना प्रोत्साहित करून आपली व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी मजबूत करणे.

मित्रांनो, एक विकसनशील देश म्हणून आपल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी गरज आणि निकड भारत जाणतो.

आणि, एक मित्र म्हणून, तुम्हाला तुमच्या लोकांसाठी काय साध्य करायचे आहे यावर देखील आमच्या प्रयत्नांचा भर राहील.

यासंदर्भात, दार-ए-सलामसाठी जल आपूर्तीत वाढ करणारा 100 दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प पूर्ण होणे ही चांगली कामगिरी आहे. आताच आम्ही झांझिबारमधील पाणी पुरवठा करारावर स्वाक्षऱ्या केल्या, यासाठी 92 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज आम्ही देऊ. आम्ही 17 शहरांसाठी अनेक जल प्रकल्पांवर देखील काम करत आहोत. आणि यासाठी भारताची अतिरिक्त 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे सवलतीचे कर्ज देण्याची भारताची इच्छा आहे. सार्वजनिक आरोग्य हा देखील आमच्या चर्चेचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

औषधे आणि उपकरणांचा पुरवठा यांसह टांझानिया सरकारच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मला सांगण्यात आले आहे की, बुगांदो चिकित्सा केंद्रात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी भारतीय रेडिओ-थेरपी यंत्र बसवले जात आहे.

शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही तुमची अन्य प्राधान्य क्षेत्र असून यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची भारताची इच्छा आहे.

मला माहित आहे, अरुषा येथील नेल्सन मंडेला आफ्रिकन विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील माहिती तंत्रज्ञान रिसोर्स केंद्र लवकरच पूर्ण होणार आहे.

भारताचे टांझानियाबरोबर सहकार्य हे नेहमीच तुमच्या गरजा आणि प्राधान्य क्रमांनुसार असेल.

मित्रांनो,

हिंद महासागरातील शेजारी या नात्याने, एकूणच संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी, विशेषत: सागरी क्षेत्रातील अधिक दृढ करण्याबाबत राष्ट्रपतींचे आणि माझे एकमत झाले.

आमची प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरील सखोल चर्चा आमच्या समान समस्या आणि हिताच्या मुद्यांवरील एककेंद्राभिमुखता दर्शवते. दहशतवाद आणि हवामान बदलाच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर नेटाने काम करण्यासाठी आम्ही तयारी दर्शवली आहे.

हवामान बदलासंदर्भात, पॅरिस येथील सीओपी 21 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांसाठी भारताने पुढाकार घेतला होता. या आघाडीमध्ये 120 हून अधिक देशांचा पाठिंबा असलेल्या या आघाडीमध्ये, एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून आम्ही टांझानियाचे स्वागत करतो.

मित्रांनो,

भारतात आम्हाला टांझानियाच्या प्रत्येक राष्ट्रपतींचे स्वागत करण्याचा मान मिळाला आहे. शक्य तितक्या लवकर राष्ट्रपती मानुफुली यांचे भारतात स्वागत करण्यासाठी मी उत्सूक आहे. शेवटी, महामहीम राष्ट्रपती तुमच्या मैत्रीबद्दल आणि माझे अगत्याने स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

धन्यवाद..

खूप खूप धन्यवाद!

S.Tupe/S. Kane