पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला झेबू गुरांचे जेनोमिक्स आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यातील सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली. ऑक्टोबर २०१६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या सामंजस्य करारामुळे भारत आणि ब्राझील यांच्यातील सध्याचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर सहमतीने संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून जिनोमिक्स आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळेल.
कृती आराखडा तयार करण्यासाठी आणि त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी दोन्ही देशांच्या समान प्रतिनिधींची अंमलबजावणी समिती स्थापन केली जाईल.
शाश्वत दुग्ध विकास आणि संस्थात्मक बळकटीकरण याबाबत सध्याचे ज्ञान अधिक व्यापक करण्यासाठी गायी आणि म्हशींची उत्पादकता सुधारण्याच्या क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवले जातील.
B.Gokhale/S.Kane/D.Rane