Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह बैठक

जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह बैठक


नवी दिल्ली, 14 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह 14 जून 2024 रोजी बैठक घेतली. पंतप्रधान जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असून परिषदेव्यतिरिक्त ते घेत असलेल्या बैठकींमध्ये या बैठकीचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

2. दोन नेत्यांनी या बैठकीत द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत चर्चा केली. युक्रेनमधील परिस्थिती आणि स्वित्झर्लंड यजमानपदी असलेल्या आगामी शांतता शिखर परिषदेसंदर्भात आपापली मते त्यांनी या बैठकीत मांडली.

3. पंतप्रधानांनी युक्रेनमधील संघर्ष शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे असे सांगितले. संवाद आणि मुत्सदेगिरीच्या माध्यमातून संघर्ष सोडवता येईल या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

4. संपर्कात राहण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai