Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी घेतली जर्मनीचे चान्सलर यांची भेट

जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी घेतली जर्मनीचे चान्सलर यांची भेट


नवी दिल्‍ली, 27 जून 2022 

जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली.

या उभय नेत्यांची या वर्षातील ही दुसरी भेट होती; यापूर्वी 2 मे 2022 रोजी भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतीसाठी पंतप्रधानांच्या बर्लिन दौऱ्यारम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. जी-7 शिखर परिषदेचे निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी चान्सलर स्कोल्झ यांचे आभार मानले.

गेल्या महिन्यापासून सुरु झालेली त्यांच्यातील चर्चा जारी ठेवत, उभय नेत्यांनी हरित आणि शाश्वत विकास भागीदारी पुढे नेण्याच्या गरजेवर भर दिला. या चर्चे दरम्यान हवामान  कृती, हवामान वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांसारख्या  मुद्द्यांचा समावेश होता. व्यापार, गुंतवणूक आणि लोकांमध्ये असलेले परस्पर संबंध अधिक दृढ करण्याच्या गरजेवरही दोन्ही नेत्यांनी  सहमती दर्शवली.

आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक समन्वय,विशेषत: भारताच्या आगामी जी -20 अध्यक्षपदाच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली.उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचार विनिमय केला.

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com