नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेन्द्र सिंह जी, देशभरातूनयेथे आलेले सर्व शास्त्रज्ञ, इतर मान्यवर, महिलांनो आणि पुरुषांनो !
आज भारताने संशोधनाच्या जगात एक अतिशय ऐतिहासिक पाऊल उचललेआहे. जीनोम इंडिया प्रकल्पाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, कोविडच्या आव्हानांना न जुमानता, आपल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला आनंद आहे की आयआयएससी, आयआयटी, सीएसआयआर आणि ब्रिक यांसारख्या देशातील 20 हूनअधिक आघाडीच्या संशोधन संस्थांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकल्पाचा डेटा, 10,000 भारतीयांचा जीनोम क्रम, आता भारतीय जैविक डेटा सेंटरमध्ये उपलब्ध आहे. मला विश्वास आहे की हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
जीनोम इंडिया प्रकल्प हा भारतातील जैवतंत्रज्ञान क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला असे सांगण्यात आले आहे की या प्रकल्पाच्या मदतीने आपण देशात वैविध्यपूर्ण जनुकीय संसाधने निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. या प्रकल्पांतर्गत देशात वेगवेगळ्या लोकसंख्यांशी संबंधित 10 हजार लोकांची जनुकीय क्रमवारी करण्यात आली आहे. आता हा डेटा आपल्या वैज्ञानिकांना उपलब्ध होत आहे. यामुळे आपल्या Scholars ना, आपल्या Scientists ना भारताचे GeneticLandscape समजून घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या माहितीमुळे देशाची धोरण निश्चिती आणि योजनांची निर्मिती खूपच सोपी होणार आहे.
मित्रांनो,
तुम्ही सर्व येथेआपापल्या क्षेत्रातील तज्ञ आहात, मोठे शास्त्रज्ञ आहात, तुम्हालाही भारताची विशालता आणि भारताची विविधता, केवळ खाणे-पिणे, राहणीमान आणि भूगोलापुरती मर्यादित नाही याची जाणीव आहे. भारतात राहणाऱ्या लोकांमध्ये जी जनुके आहेत, त्यातही मोठी विविधता आहे. अशातच आजारांचे स्वरुप देखील नैसर्गिक रुपात विविधतेने भरलेले आहे. म्हणूनच कोणत्या व्यक्तीला कोणते औषध फायदेशीर ठरेल याचे आकलन अतिशय गरजेचे आहे. यासाठी देशवासियांना त्यांची Genetic Identity माहीत असणे गरजेचे आहे.
आता जशी आपल्या आदिवासी समाजात सिकल सेल ऍनेमिया या आजाराची एक खूप मोठी समस्या आहे. तिचा सामना करण्यासाठी आम्ही नॅशनल मिशन सुरू केले आहे. मात्र, यामध्ये देखील आव्हाने कमी नाहीत. अशी शक्यता असू शकते की सिकल सेलची समस्या आपल्या एका भागातील आदिवासी समाजात असेल ती दुसऱ्या भागातील आदिवासी समाजात नसेल. तिथे दुसरा प्रकार असेल. या सर्व गोष्टींची माहितीआपल्याला तेव्हाच होईल, जेव्हा एक संपूर्ण geneticstudy आपल्याकडे असेल. भारतीय लोकसंख्येतील अनोख्या जनुकीय पॅटर्नला जाणून घेण्यासाठी याची मदत मिळेल. आणि तेव्हाच आपल्याला एखाद्या विशिष्ट गटाच्या समस्येसाठी तशाच प्रकारचा विशिष्ट उपाय किंवा मग प्रभावी औषध तयार करता येऊ शकेल.
मी सिकल सेलचे उदाहरण दिले. पण हे यापुरते मर्यादित नाही आहे. मी तर केवळ एक उदाहरण म्हणून त्याची माहिती दिली. भारतात अनुवंशिक आजार म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत स्थानांतरित होणाऱ्या आजारांच्या खूप मोठ्या भागाविषयी आपण आजही अपरिचित आहोत. जीनोम इंडिया प्रोजेक्ट, भारतात अशा सर्व आजारांसाठी प्रभावी उपचार विकसित करण्यामध्ये सहाय्यकारक ठरेल.
मित्रांनो,
21व्या शतकात बायो-टेक्नोलॉजी आणि बायोमास यांचे कॉम्बिनेशन, Bio Economy च्या रूपात विकसित भारताच्या पायाचा एक प्रमुख भाग आहे. Bio Economy चे उद्दिष्ट असते नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, Bio-Based उत्पादने आणि सेवांचा पुरस्कार आणि या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे. Bio Economy, शाश्वत विकासाला गती देते, नवोन्मेषाच्या संधी देते.गेल्या 10 वर्षात, देशाची Bio Economy वेगाने पुढे गेली आहे. 2014 या वर्षात जी BioEconomy 10 बिलियन डॉलरची होती ती आज दीडशे अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. भारत आपल्या बायो-इकोनॉमीला नव्या उंचीवर देण्यामध्ये गुंतलेला आहे. काही वर्षांपूर्वी भारताने Bio E3 Policy सुरू केली आहे. या धोरणाचा दृष्टीकोन हा आहे की भारत IT Revolution प्रमाणेच GlobalBiotech Landscape मध्येही एक नेता म्हणून उदयाला येईल. यामध्ये तुम्हा सर्व शास्त्रज्ञांची मोठी भूमिका आहे आणि यासाठी मी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
जगाचे एक मोठे औषधी केंद्र म्हणून भारताने आपली जी ओळख निर्माण केली आहे, तिला आज देश नवे आयाम देत आहे. गेल्या दशकात भारताने सार्वजनिक आरोग्य निगाविषयक अनेक क्रांतिकारी पावले उचलली आहेत. कोट्यवधी भारतवासियांना मोफत उपचारांची सुविधा असो, जनौषधी केंद्रात 80 टक्के सवलतीने औषधे उपलब्ध करणे असो,आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांची निर्मिती असो, गेल्या 10 वर्षातील या सर्व खूप मोठ्या कामगिरी आहेत. कोरोना काळात भारताने हे सिद्ध केले आहे की आपली औषधी परिसंस्था किती सामर्थ्यवान आहे.औषधाच्या उत्पादनासाठी भारतातच मजबूत पुरवठा आणि मूल्य साखळी बनावी, हा आमचा प्रयत्न आहे. जीनोमइंडिया प्रकल्प आता या दिशेनेभारताच्या प्रयत्नांना नवी गती देईल, ऊर्जेने भरेल.
मित्रांनो,
आज जग जागतिक समस्यांवरील तोडग्यांसाठी भारताकडे पाहात आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी ही एक जबाबदारी देखील आहे एक संधी देखील आहे. म्हणूनच आज भारतात एका खूप मोठ्या संशोधनपरिसंस्थेची निर्मिती केली जात आहे. गेल्या 10 वर्षात संशोधन आणि नवोन्मेषाच्याअभ्यासाकरिता प्रत्येक स्तरावर खूप जास्त भर देण्यात आला आहे. आज 10 हजारांपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्जमध्ये आपले विद्यार्थी दररोज नवनवे प्रयोग करत आहेत.तरुणांमध्ये नवोन्मेषी कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो अटल इनक्युबेशन सेंटर तयार झाले आहेत. PHDदरम्यान संशोधनासाठी पीएम रिसर्च फेलोशिप स्कीम देखील चालवली जातआहे. Multi-Disciplinary आणि InternationalResearch ला प्रोत्साहन मिळावे,यासाठी नेशनल रिसर्च फंड स्थापन केला आहे. Anusandhan NationalResearch Foundation मध्ये, ज्यामुळे देशात विज्ञान, अभियांत्रिकी, पर्यावरण, आरोग्यअशा प्रत्येक क्षेत्रात आणखी नवीन प्रगती होणार आहे. Sunrise technologies मध्ये संशोधन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा corpus निर्माण करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. यामुळे बायो-टेक्नोलॉजी क्षेत्राचा देखील विकास होईल आणि youngscientists ना खूप मदत मिळेल.
मित्रांनो,
अलीकडेच सरकारने One Nation One Subscription चा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील प्रतिष्ठित जर्नल्स पर्यंत भारताच्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना पोहोचता यावे, त्यांना खर्च करावा लागू नये, हे आमचे सरकार सुनिश्चित करेल. हे सर्व प्रयत्न, भारताला 21व्या शतकातील जगाचे ज्ञान केंद्र, नवोन्मेष केंद्र बनवण्यात मदत करतील.
मित्रांनो,
ज्या प्रकारे आमच्या लोकाभिमुख शासनाने, आमच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी जगाला एक नवीन मॉडेल दिले आहे, त्याच प्रकारे जिनोम इंडिया प्रकल्प देखील जनुकीय संशोधनाच्या क्षेत्रात भारताची प्रतिमा आणखी सशक्त करेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जिनोमइंडिया च्या यशस्वितेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
The Genome India Project marks a defining moment in the country's biotechnology landscape. My best wishes to those associated with the project. https://t.co/7xN8U9y4Ds
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2025