Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक बँकेच्या जी 20 दस्तऐवजात भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे झालेल्या आर्थिक समावेशनाची प्रशंसा


भारताने केवळ 6 वर्षात आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठले आहे, अन्यथा याला किमान 47 वर्षे लागली असती, असे जागतिक  बँकेने आपल्या जी 20 दस्तऐवजात नोंदवले आहे,जागतिक बँकेचे हे निष्कर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  सामायिक केले

 पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले

“डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे समर्थित, आर्थिक समावेशनात भारताची झेप !

@WorldBank द्वारे तयार करण्यात आलेल्या  जी -20 दस्तऐवजात भारताच्या विकासाबद्दल अतिशय लक्षवेधी  मुद्दा सामायिक करण्यात आला आहे. तो म्हणजे भारताने केवळ 6 वर्षात आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट गाठले आहे, अन्यथा याला किमान 47 वर्षे लागली असती.

 आपल्या  बळकट  डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा  आणि आपल्या लोकांच्या हिंमतीची ही  प्रशंसा आहे.  त्याचप्रमाणे .गतिमान  प्रगती आणि नवोन्मेषाची  ही साक्ष आहे.

https://www.news18.com/india/if-not-for-digital-payment-infra-in-6-yrs-india-would-have-taken-47-yrs-to-achieve-growth-world-bank-8568140.html

****

 Jaidevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai