Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा लोकांनी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

“पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा आज जलदिनानिमित्त आपण घेऊ या. पाणी वाचवण्याचा निर्णय एकदा का “जनशक्तीने” मनापासून घेतला, तर आपण “जलशक्ती” यशस्वीपणे वाचवू शकणार आहोत.

संयुक्त राष्ट्राने यावर्षी सांडपाणी विषय निवडला आहे. त्यामुळे पाण्याच्या पुनर्वापराविषयी जागृती निर्माण होईल तसेच पाण्याचे आपल्याला असलेले महत्व अधोरेखित करेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha