Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश पुढीलप्रमाणे:

“आज जागतिक आरोग्य दिनी आपण एकमेकांच्या उत्तम आरोग्य आणि निरामय जीवनासाठी केवळ प्रार्थना करायची नाही तर कोविड-19 संकटाविरोधातील लढ्याचे निर्भयपणे नेतृत्व करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांप्रति पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूया…

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनी, आपण सुनिश्चित करूया की, आपण सामाजिक अंतरासारख्या पद्धतींचे पालन करत आहोत ज्यामुळे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाचे रक्षण होईल. हा दिवस आपल्याला वर्षभर वैयक्तिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने प्रेरणा देवो ज्यामुळे आपले सर्वांगीण आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”

B.Gokhale/S.Kane/D.Rane