नवी दिल्ली, 9 जून 2023
जल जीवन अभियान अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेची भूमिका अधोरेखित केली आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका ट्विट मालिकेमध्ये माहिती दिली आहे. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार नळाद्वारे पाणी पुरवण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीमुळे 4 लाख लोकांचा अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूंपासून बचाव होईल.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“जल जीवन अभियानाची संकल्पना प्रत्येक भारतीयाला स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मांडण्यात आली होती, जे सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाया आहे. आम्ही हे अभियान बळकट करत राहू आणि आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी देत राहू .”
Jal Jeevan Mission was envisioned to ensure that every Indian has access to clean and safe water, which is a crucial foundation for public health. We will continue to strengthen this Mission and boosting our healthcare system. https://t.co/lAwx6DSyfK
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2023
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai