Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी नळ जोडणी पूर्ण झाल्याच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा


पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 11 कोटी नळजोडणी झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे. मोदींनी या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी परीश्रम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,

“भारतातील लोकांना ‘हर घर जल’सुनिश्चित करण्यासाठी केलेला एक महान पराक्रम ! या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी परीश्रम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.”