Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन

जर्मनीच्या चॅन्सेलर  अँगेला मर्केल  यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  पंतप्रधानांचे निवेदन


चॅन्सेलर मर्केल,

जर्मन प्रतिनिधीमंडळाचे सदस्य,

माझे सहकारी,

प्रसारमाध्यमांचे सदस्य,

चॅन्सेलर अँगेला मर्केल आणि त्यांच्या कुशल प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे.

जर्मनीच्या एकत्रीकरणाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय जनतेच्या वतीने मी जर्मनीचे अभिनंदन करतो. या अशा महत्त्वाच्या मैलाच्या टप्प्यावर, देशात आणि परदेशात तुम्ही काय कमावले आहे, याकडे तुम्ही अभिमानाने मागे वळून पाहू शकता. चॅन्सेलर मर्केल, युरोपसाठी तसेच जगासाठी कठीण क्षण असताना, तुमचे नेतृत्व हा आत्मविश्वासाचा आणि दिलाशाचा स्रोत आहे. तुमच्या खंडामध्ये अनेक कामे असूनही तुम्ही भारताला भेट द्यायचे ठरवले. तुमच्या प्रतिनिधीमंडळाचे बळ दर्शवत आहे की भारताबरोबरच्या संबंधांना तुम्ही किती महत्त्व देता आणि आंतर सरकारी चर्चांकडे तुम्ही किती गांभीर्याने पाहता. तुमची प्रतिबध्दता ही आपल्या संबंधांच्या प्रगतीची किल्ली आहे. तुमचे खूप खूप आभार !

आंतरसरकारी चर्चेची यंत्रणा वैशिष्टयपूर्ण आहे आणि यामुळे आपले संबंध वृध्दिंगत झाले आहेत. याखेरीज गेल्यावर्षीही दोन्ही देशांनी आपले संबंध सखोल केले होते. भारतातील आर्थिक सुधारणांचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आम्ही जर्मनीकडे नैसर्गिक भागीदार म्हणून बघतो. जर्मनीची ताकद आणि भारताचे प्राधान्यक्रम हातात हात घालून जातात त्यामुळे आमचे परस्पर हितसंबंध आहेत.

आपले लक्ष्य आर्थिक संबंधांवर असले पाहिजे. मात्र अमर्यादित आव्हाने आणि संधीच्या जगात भारत आणि जर्मनी, जगाच्या अधिक मानवी, शांततामय, न्याय आणि शाश्वत भवितव्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मजबूत भागीदार होऊ शकतात, असे मला वाटते. आपल्या संबंधांना समृध्द इतिहास आहे. दोन्ही देशांमध्ये काही समान मूल्ये आहेत. दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये सहजता आहे आणि जगाप्रती जबाबदारीची भावना आहे.

आज आमच्यात सुमारे तीन तास चर्चा झाली. आमच्यातला संवाद आज आणि बंगळुरु येथे उद्याही होईल. आमच्यातल्या चर्चेचा मला आनंद झाला आणि त्यातून व्यापक निष्कर्षही निघाले.

आपल्या विकास कार्यक्रमाला जर्मनीचा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक आहे. निर्मिती, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील गुंतवणूक, व्यापार आणि तंत्रज्ञान भागिदारी वाढण्याबाबत आपण अपेक्षेने पाहत असून याबाबत विश्वास वाटत आहे. जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान कौशल्य, अधिक कार्यक्षम, स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी पुढल्या काळातील औद्योगिकता निर्माण करु शकतात.

भारतातील 1600 जर्मन कंपन्या आणि त्यांची वाढती संख्या भारतात जागतिक कार्यदळ निर्माण करण्यासाठी मजबूत भागीदार ठरतील.

स्मार्ट सिटी, गंगा शुध्दीकरण आणि कचरा व्यवस्थापन यात जर्मनीचे मोलाचे सहकार्य आणि सहाय्य लाभत आहे. तसेच अभियांत्रिकीपासून मानवतावादी विषयांच्या अभ्यासाबाबत.

स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात जर्मनीचे नेतृत्व आणि हवामान बदलाविरोधातल्या लढयातली प्रतिबध्दता याचे मी कौतुक करतो. या क्षेत्रात आपल्या मतांमध्ये एककेंद्रभिमुखता आहे आणि वाढते सहकार्य आहे. भारताच्या हरित ऊर्जा कॉरिडॉरला जर्मनीने एक अब्ज युरोंपेक्षा दिलेले अधिक सहाय्य आणि भारतातील सौर प्रकल्पांसाठी एक अब्जांहून अधिक युरोंचे नवे सहाय्य खूप मोलाचे आहे. स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेसंदर्भात तसेच ऊर्जा कार्यक्षमतेबाबत संशोधन सहकार्य वृध्दिंगत करण्याची आमची इच्छा आहे.

पॅरिस येथे होणाऱ्या “कॉप 21” मधून ठोस परिणामांची अपेक्षा आहे. अधिक शाश्वत विकासाच्या मार्गावरुन मार्गक्रमण करण्याची जगाची खास करुन गरीब देशांची क्षमता, प्रतिबध्दता या परिषदेतून दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.

संरक्षण निर्मिती, प्रगत तंत्रज्ञानातला व्यापार, दहशतवादाला आळा या क्षेत्रातही आमचे सहकार्य वाढेल. आपल्या वाढत्या संबंधात सुरक्षेचे पैलू महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण प्रणालीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला जर्मनीच्या भक्कम पाठिंब्याचे मी स्वागत करतो. न्यूयॉर्क येथील जी-4 परिषदेत आम्ही चर्चा केल्याप्रमाणे, मी आणि चॅन्सेलर, संयुक्त राष्ट्रांमध्ये खास करुन सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा व्हाव्यात, यावर ठाम आहोत.

पश्चिम आशियातील बंडाळी, युरोपातील आव्हाने आणि शांत व स्थिर आशिया पॅसिफिक तसचे हिंदी महासागर क्षेत्र याबाबत आमचे समान दृष्टिकोन आहेत. अफगाणिस्तानातल्या शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी जर्मनीने अनमोल सहाय्य दिल्याबद्दल मी चॅन्सेलर यांचे आभार मानतो.

जम्मू काश्मीरमधली महिषासूरमर्दिनी अवतारातील दुर्गेची दहाव्या शतकातील मूर्ती परत केल्याबद्दल चॅन्सेलर मर्केल आणि जर्मनीच्या जनतेप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. महिषासूरमर्दिनी ही वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे.

संक्रमणाच्या या युगात भारत-जर्मनी यांची भागीदारी जगाच्या भल्यासाठीचे बळ ठरेल, हे यातून सूचित होते.

आपल्या दोन्ही संस्कृतीत एक समान उक्ती आहे, ती म्हणजे, मैत्री हा असा वृक्ष आहे ज्याला नियमित पाणी घालणे आवश्यक आहे. या विशेष बैठकीनंतर मला विश्वास वाटतो की आपल्यातला मैत्रीचा वृक्ष बहरणार आहे.

S. Kulkarni/S.Tupe