Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनीच्या चॅन्सेलरपदी सलग चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल अंजेला मर्केल यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


जर्मनीच्या चॅन्सेलरपदाची सूत्रे सलग चौथ्यांदा हाती घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँजेला मर्केल यांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले आहे.

चॅन्सेलर मर्केल यांनी जर्मनीला इतक्या वर्षात दिलेल्या भक्कम आणि कणखर नेतृत्वाची पंतप्रधानांनी तारीफ केली. त्यांच्या नेतृत्व काळात युरोपातील महत्वाच्या निर्णयांमध्ये जर्मनीने बजावलेल्या भूमिकेंचेही पंतप्रधांनी कौतुक केले.

चॅन्सेलर मर्केल यांच्या नेतृत्वकाळात भारत-जर्मन संबंध अधिक दृढ करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

येत्या 22 ते 26 मार्चला, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्क वॉल्टर स्टेनमिअर भारत दौऱ्यावर येत असून, त्यांचे स्वागत करण्यात आपण उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar