Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांच्या विकास पॅकेजमधील ठळक नोंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरसाठी 80,000 कोटी रुपयांचे विकास पॅकेज जाहीर केले. त्यातील ठळक नोंदी पुढीलप्रमाणे

पूरग्रस्तांना मदत, पुनर्रचना आणि पूर व्यवस्थापन- रु. 7854 कोटी

पुरामुळे नूकसान झालेल्या व्यक्तींना घरांची बांधणी करण्यासाठी रोख रक्कमेची मदत, व्यावसायिक आणि लघु उद्योजकांना उपजिवीकेसाठी पुनर्रचनेसाठी मदत, झेलम व तिच्या उपनद्यांसाठी व्यापक पूर व्यवस्थापन आणि झेलम-तावी पूर पुनर्रचना प्रकल्प.

रस्ते आणि महामार्ग प्रकल्प- रु. 42611 कोटी

झोजिला बोगद्याचे बांधकाम, जम्मू-काश्मीरमध्ये सेमी रिंग रोडस, भारत माला प्रकल्पांतर्गत उत्तम जोडणी, राज्यातील महामार्ग आणि इतर प्रकल्प अद्ययावत करणे.

ऊर्जा, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा- रु. 11708 कोटी

पायाभूत ऊर्जा संरचनेत आणि वितरण प्रणालीत सुधारणा, सौर ऊर्जा, लघु जलविद्युत प्रकल्प

आरोग्य- रु. 4900 कोटी

याअंतर्गत राज्याच्या राजधानींमध्ये दोन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत.

मनुष्यबळ विकास, कौशल्य विकास आणि क्रीडा- रु. 2600 कोटी

या अंतर्गत जम्मूमध्ये आयआयटी आणि आयआयएमची उभारणी, हिमायत योजनेअंतर्गत पाच वर्षाच्या काळात एक लाखापेक्षाही जास्त युवकांना प्रशिक्षण देणे, क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मदत करणे.

कृषी आणि अन्न प्रक्रिया- रु. 529 कोटी

यात फळबाग विकासाठी मदत, शीतकरण केंद्रांची उभारणी

पर्यटन- रु. 2241 कोटी

यात पर्यटन स्थाने आणि नवीन प्रकल्प, 50 पर्यटनग्राम उभारणे

नगर विकास- रु 2312 कोटी

जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत निधीचा पुरवठा.

निर्वासित जनतेची सुरक्षा आणि कल्याण- रु. 5263 कोटी

काश्मीरी निर्वासितांसाठी रोजगार, छांब आणि पाक व्याप्त काश्मीरमधील कुटुंबाचे पुनर्वसन, घरांची बांधणी, पाच भारतीय आरक्षित बटालियन्सची उभारणी, भारतीय आरक्षित बटालियन्स जम्मू आणि काश्मीरमधील युवकांसाठी 4000 नोकऱ्या निर्माण करेल.

पश्मिना चालना प्रकल्प- रू 50 कोटी

एकूण पॅकेज- रू. 80,068 कोटी

या पॅकेजमध्ये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत रु. 837 कोटी आणि गेल्यावर्षीच्या पूरानंतर दिलेल्या 1000 कोटी रुपयांचा यात समावेश आहे.

S.Thakur/S.Tupe/N.Sapre