मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधु आणि भगिनींनो,
खूप चांगले ऋतूमान आहे. मी आत्ता मेहबूबा जीं चे बोलणे ऐकत होतो. त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने काश्मीरचे भवितव्य घडविण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी या राज्याला जोमदार नेतृत्व दिले आहे. त्यांनी अनेक सरकारे स्थापन केल्यानंतर आज पहिल्यांदा मला येथे येण्याची संधी प्राप्त झाली आहे. मी त्यांना आणि जम्मूा काश्मीरला हृदयापासून खूप – खूप शुभेच्छा देतो. खरे तर आजचा हा प्रसंग, समारंभ हा जम्मूू काश्मीर वासियांच्या जगण्याला एक नवा उत्साह देणारा प्रसंग आहे. मात्र या प्रसंगी मुफ़्ती साहेब आपल्यासोबत उपस्थित नाहीत. त्यांनी दीर्घ काळ सार्वजनिक आयुष्य व्यतीत केले आणि जेव्हा जेव्हा माझा त्यांच्याशी संवाद झाला तेव्हा तेव्हा जाणवत राहिले की या माणसाच्या मनात कायम एकाच गोष्टीचा ध्यास आहे, तो म्हणजे देशाला प्रगतीपथावर नेण्याचा, जम्मूे-काश्मीरला प्रगतीपथावर नेण्याचा. एकाच गोष्टीचा विचार त्यांच्या मनात सदैव असे. जम्मूम आणि श्रीनगर यांच्यात अनेकदा जो दुरावा दिसून येत असे, तो त्यांना संपवायचा होता. भारतातील प्रत्येक भारतीयाला आपल्या या प्रिय जम्मूि-काश्मीरबद्दल अभिमान वाटावा, अशा प्रकारे सरकार चालवावे, विकासाची कामे करावीत, अशा प्रकारची स्वप्ने मुफ्ती साहेबांनी पाहिली होती.
अलीकडच्या काळात अनेकदा मेहबूबाजींबरोबर माझी भेट झाली. मला आठवते की ज्या प्रकारे तल्लीन होऊन त्या जम्मून-काश्मीरच्या विकासाबाबत चर्चा करत, आत्ता सुद्धा ती भावना कायम आहे. आत्ताही त्या हवा-पाण्याच्या गप्पा मारत बसलेल्या नाहीत. पर्यटनाचे काय होईल, त्या रस्त्याचे काय होईल, त्या ठिकाणी पूल उभारायचा आहे, त्याचे काय करावे, अशा विषयांवर त्यांची चर्चा सातत्याने सुरू आहे. जेव्हा ही भावना तुमच्या मनात असते, विकासाबाबत तुम्ही इतक्या समर्पित भावनेने विचार करू लागता, तेव्हा विकास होणारच, याची खात्री पटते आणि त्याचमुळे मी मेहबूबाजींचे खूप खूप अभिनंदन करतो.
आज मला माता वैष्णो देवीच्या चरणी येऊन तीन संधी प्राप्त झाल्या, तीन कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. आज सकाळी विद्यापीठात पदवीदान समारंभात मला युवकांची भेट घेण्याची संधी मिळाली. भारतातील फार कमी लोकांना माहिती असेल की जम्मूे-काश्मीर जवळ-जवळ सर्व राज्यांच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ठेवून घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. ही जम्मूय काश्मीरची एक स्वतंत्र ओळख आहे, जी देशाला शक्ती देते आणि देशाचा गौरव वाढविते. आज मला एका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याची संधीही प्राप्त झाली. जीवनात खेळ नसेल तर उमलणे अशक्य होऊन जाते. जो खेळतो, तोच खऱ्या अर्थाने उमलतो. अनेकदा आपण आयुष्यात एक शब्द अभिमानाने ऐकतो. तो शब्द केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर ऐकतो. एखाद्या व्यक्तीने काही चांगले केले, काही वेगळे केले तर आपण लगेच म्हणतो की खरे तर त्याच्यामध्ये खूप चांगली खिलाडूवृत्ती आहे. दोन भावांमध्ये काही वाद झाला आणि त्यापैकी एका भावाने औदार्य दाखविले की, आपण लगेच म्हणतो की तो जो भाऊ आहे ना, त्याच्याकडे खिलाडूवृत्ती आहे. खिलाडूवृत्ती ही मैदानात खेळाडूंनी केलेल्या साधनेचे फळ आहे. खिलाडूवृत्ती असली की ,माणूस अधिक ताकदवान होतो. खेळ असला तर खिलाडूवृत्ती आपसूक येते आणि खिलाडूवृत्ती असली की आपुलकीची भावना, कोणासाठी तरी काही त्याग करण्याचा निर्धार, कोणाला तरी सोबत पुढे घेऊन जाण्याचा निर्धार, खांद्याला खांदा लावून विजय प्राप्त करण्याची हिम्मत, सोबत पावले पुढे टाकण्याचा निर्धार अशा बाबीही ओघाने समोर येतात. माता वैष्णो देवी देवस्थान मंडळातर्फे हे जे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे, ते केवळ खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर ते खिलाडू वृत्तीलाही प्रोत्साहन देईल, जी आयुष्यात एखाद्या वंगणासारखे काम करेल. आयुष्याला शक्ती देण्याचे काम करेल.
काश्मीर चे तरूण जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतात, तेव्हा मन अभिमानाने भरून येते. २०१७ साली भारतात १७ वर्षांखालील खेळाडूंची फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा, भारतातील तरूण वर्गाला एक नवी ताकत देणारी, नवा जोम देणारी आणि उत्साहाने भारून टाकणारी संधी झाली पाहिजे. जगभरातले लोक, खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याकडे येणार आहेत. फुटबॉल या खेळात आपली कामगिरी काही फार चांगली नाही, आपण या खेळात फारच पिछाडीवर आहोत. मात्र तरीसुद्धा आपण एकत्र येऊन असे वातावरण तयार करू या, या खेळाला अशा प्रकारे आपलेसे करू या की ज्यामुळे अवघ्या जगाला भारतातील विविधता, भारताची युवा शक्ती, भारताचे सामर्थ्य जाणवावे. ही वातावरण निर्मिती करण्यात आपले हे क्रीडा संकुलसुद्धा महत्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास वाटतो.
आज मला रूग्णालयाचे उद्घाटन करायची संधी सुद्धा मिळाली आहे. आता रूग्णालयाचे उद्घाटन आहे, तेव्हा आपले रूग्णालय कायम भरलेले असो, कधीही ते रिकामे राहू नये, अशा शुभेच्छा मला देता येणार नाही. माझी मनापासून इच्छा आहे की रूग्णालयात जाण्याची वेळ कोणावरही येऊ नये. क्रीडा संकुलाबद्दल बोलायचे झाल्यास, जीवनात क्रीडाप्रकार कायम असतील तर रूग्णालयांपासून दूर राहणे शक्य होऊ शकेल.
प्रतिबंधात्मक उपाययोजना या सर्वात स्वस्त आहेत आणि त्या सुरक्षित सुद्धा आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आपण जितके अधिक लक्ष देऊ, तितके रूग्णालयांपासून दूर राहता येईल. देशातील कमीत कमी लोकांवर रूग्णालयात जायची वेळ यावी, अगदीच अपरिहार्य स्थिती उद्भवल्यास रूग्णालयात जावे लागावे, अशीच आमची इच्छा आहे. कोणालाही रूग्णालयात जावे लागावे आणि डॉक्टरच्या आधाराने जगण्याची वेळ यावी, असे कोणाच्याही बाबतीत घडू नये. त्याचसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना उपयुक्त आहेत. सध्या आपली जीवन शैली बदलते आहे. आपण आजारी नाही, असे सांगायला काही लोकांना आवडत नाही. अच्छा, इतकी वर्षे झाली, आपण आजारी पडलातच नाही? कधीतरी वेगाने चालताना दिसलो तर लोक विचारतात, थकवा नाही का येत तुम्हाला? मला असे वाटते की स्वच्छता ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारपणापासून दूर ठेवते. आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते भारतातील अस्वच्छतेमुळे गरीब कुटुंबाचे सरासरी ७ हजार रूपये औषधांवर खर्च होतात. जर कुटुंबामध्ये ४,५ किंवा ६ सदस्य असतील तर २५-३० हजार रूपये दर वर्षी औषधांवर खर्च होतात. पण स्वच्छता राखणे ही आपल्या हातातली, आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे.
बालकांनी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत. जी बालके लहान वयात मृत्युमुखी पडतात, त्यापैकी ४० टक्के बालके हात साबणाने स्वच्छ न धुणारी असतात. त्यांच्या पोटात काही अनिष्ट घटक जातात आणि त्यामुळे ती बालके दगावतात. या लहान-सहान बाबी आपल्याला रूग्णालयात जाण्यापासून रोखतात. आता आपण माता वैष्णो देवीच्या चरणी बसलो आहोत, माता वैष्णो देवीच्या कृपेने इतके मोठे रूग्णालय उपलब्ध झाले आहे. अशा वेळी, आपण स्वच्छता मोहिम राबवली पाहिजे आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याच्या दृष्टीने परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने स्वत:ला सक्षम केले पाहिजे.
भारताने जगभरात योगविद्येचा प्रसार केला. आता संयुक्त राष्ट्रे सुद्धा २१ जून रोजी योग दिवस साजरा करतात. गेल्या वर्षी जगातील १९३ देशांनी योग उत्सव साजरा केला. समग्र आरोग्य संगोपनावर ज्यांचा विश्वास आहे, ते सगळे आज योगविद्येकडे वळले आहेत. शरीर निरोगी राखण्यासाठी, प्रतिबंधात्मक आरोग्य संगोपनासाठी केवळ आरोग्यच नाही तर समग्र स्वस्थतेसाठीही योगविद्येचे विशेष योगदान आहे. या देवस्थान मंडळाचे मी विशेष आभार मानतो, कारण रूग्णालयासाठी जागा देणाऱ्या पाच नागरिकांना आरोग्य कार्ड प्रदान करण्याची संधी त्यांनी मला दिली. ज्या गावांनी ही जमीन दिली आणि ज्यांच्यामुळे हे रूग्णालय उभे राहिले आहे, त्या गावातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. रूग्णालयासाठी शक्य होईल, ते देणाऱ्या अथवा देऊ करणाऱ्या ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो. जमीन देणे, ही साधी सरळ गोष्ट नाही, मात्र तरीही ग्रामस्थांनी आपली जमीन दिली. त्यांनी तर जमीन दिली, त्या जमिनीने आज असे रूप धारण केले आहे की आता ही जागा लोकांना जीवन देण्याचे काम करेल आणि त्यामुळे जमीन देणाऱ्यांना कायम समाधान लाभत राहील. एक काळ असा होता, जेव्हा आपण त्या जमिनीचे मालक होता आणि आता माता वैष्णोदेवीच्या चरणी ही जमीन अर्पण केली. आज या ठिकाणी असे रूग्णालय उभे राहिले आहे, जे हजारो लोकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने सक्षम आहे. ही आयुष्यातली फार मोठी समाधानाची बाब आहे, असे मी मानतो. आणि त्याचमुळे मी सर्वात आधी या ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो.
मी आज माता वैष्णो देवी देवस्थान मंडळाचेही आभार मानतो. जगमोहनजी जेव्हा येथे राज्यपाल म्हणून कार्यरत होते, तेव्हापासून आतापर्यंत माता वैष्णो देवी देवस्थान मंडळाने या ठिकाणी सामाजिक विकासाचे अनेक उपक्रम राबविले आहेत. येथे आढळणाऱ्या प्रत्येक बाबीचा उपयोग जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी कशा प्रकारे करून घ्यावा, याचा उत्तम आदर्श या देवस्थान मंडळाने आपल्यासमोर ठेवला आहे. ते क्रीडा संकुलाची निर्मिती करतात, रूग्णालये सुरु करतात, ते सुद्धा साधे नाही तर जे देशातील नावाजलेले रूग्णालय म्हणून ओळखले जाईल, असे रूग्णालय सुरु करतात. आपल्या देशात अशा प्रकारे जी संपत्ती केवळ पडून आहे, त्याचा समाजासाठी जेवढा उपयोग होईल, तेवढीच समाजाची ताकत वाढेल. आणि हे माता वैष्णो देवी देवस्थान मंडळाने सिद्ध करून दाखविले. त्यांनी एक मार्ग दाखविला आहे. त्याचमुळे मंडळ अभिनंदनास निश्चितच पात्र आहे.
या रूग्णालयामुळे आता जम्मू काश्मीरच्या नागरिकांना गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी दूरवर जावे लागणार नाही, असा मला विश्वास वाटतो. येथे व्यवस्था चांगली असेल आणि डॉक्टपर्ससुद्धा चांगले असतील. येथील हवामान तर इतके चांगले आहे की इतर ठिकाणी बरे व्हायला १५ दिवस लागणार असतील, तर तोच रूग्ण या हवामानात पाच दिवसात बरा होईल. आणि माता वैष्णो देवीच्या चरणाशी एक असे रूग्णालय आहे आणि तेथे असे हवामान आहे, त्या ठिकाणी निम्म्या वेळात आजार बरे होतात, हे जेव्हा देशाला आणि परदेशातही समजेल तेव्हा जगभरातील पर्यटकसुद्धा वैद्यकीय उपचारांसाठी येथे येतील. ज्याप्रकारे पर्यटनासाठी लोक येथे येतात त्याचप्रमाणे आरोग्य सेवा पर्यटनासाठीसुद्धा जगभरातील लोक येथे येतील, असे स्वप्न जम्मूत-काश्मीरच्या लोकांनी पाहिले पाहिजे. आपण जगभरातील लोकांना आरोग्य सेवा पर्यटनासाठी येथे येण्यास प्रेरीत केले पाहिजे. आपण जम्मूो-काश्मीरला निश्चितच त्या उंचीवर नेऊ शकतो.
भारताने वेगाने प्रगती करावी, सव्वाशे कोटी देशवासीयांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, हे नक्की. काश्मीर असो वा कन्याकुमारी, कच्छ असो वा कामरूप, एक संतुलित विकास, सगळीकडे विकास गरजेचा आहे. केवळ विकास साध्य करूनच आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करता येईल. देशाला आधुनिक पायाभूत सुविधा हव्यात. शाळा हव्या, महाविद्यालये हवीत, रस्ते हवे, वीज हवी. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुधारणा घडून येईल, अशी व्यवस्था हवी. जेव्हा मुफ्ती साहेब होते, तेव्हा जम्मूच काश्मीरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ८० हजार कोटी रूपयांचे पॅकेज दिले गेले होते. जम्मूय काश्मीरचे भाग्य बदलण्यासाठी भारत सरकार संपूर्ण क्षमतेने खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक पावलावर साथ देत जम्मूद काश्मीरच्या आशा – आकांक्षा पूर्ण करीत आहे.
अटल बिहारी वाजपेयीजींची मला आता आठवण येते, ज्यांच्यावर जम्मूू काश्मीरच्या जनतेची अपार श्रद्धा होती. भारतात असे फार कमी नेते झाले, ज्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात इतकी आपुलकी असेल. अटल बिहारी वाजपेयीजींबद्दल तेच ममत्व जम्मूल काश्मी रच्या जनतेच्या मनात दिसून येते. जम्मूा-काश्मीरच्या जनतेला पुढे कसे नेता येईल, हाच विचार अटल बिहारी वाजपेयीजींच्या मनात असे. इंसानियत, कश्मीायरत आणि जम्मूलरियत या तीन मजबूत खांद्यांवर जम्मूा-काश्मीरला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे, असे ते म्हणत. वाजपेयीजींच्या इंसानियत, कश्मीमयरत आणि जम्मू रियत या स्वप्नात आम्ही “सर्वांची साथ- सर्वांचा विकास” या मंत्राचे रंग भरले आहेत. सर्वांचे भले व्हावे या विचारासह सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे, त्या स्वप्नांना पूर्ण करायचे आहे.
पर्यटनाच्या क्षेत्रात जम्मूा-काश्मीर भारतासाठी मोठे योगदान देऊ शकतो, असा विश्वास मला वाटतो. जेव्हा जम्मूू काश्मीरमध्ये पर्यटक येतात तेव्हा केवळ जम्मूस काश्मीरला आर्थिक लाभ होत नाही तर तो अवघ्या भारताला होतो. जम्मूे काश्मीरमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशी अनेक क्षेत्रे आहेत, जेथे आपण प्रवेश करू शकतो. त्या ठिकाणी आधुनिक पर्यटन कशा प्रकारे रूजवावे, साहसी पर्यटनास लोक उत्सुक असतात, तर ते कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, त्यादृष्टीने पर्यटन विकसित करावे. अध्यात्मिक पर्यटनात कार्य करू इच्छिणाऱ्या लोकांनाही येथे मोठा वाव आहे. जम्मूत काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याप्रती जम्मू-काश्मीर सरकार आणि भारत सरकार, दोन्ही वचनबद्ध आहेत. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने पर्यटनविषयक सुविधा विकसित व्हाव्यात. रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्याच सुखद परिणाम येत्या काही दिवसात पाहायला मिळेल. जम्मूहून श्रीनगरला जाण्यासाठी लागणारे अंतर निम्मे करण्याच्या हेतूने नवा रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. जितक्या वेगाने पायाभूत सुविधा विस्तारीत होतील, तितक्या वेगाने आपण लेह – लडाख पर्यंत पोहोचू शकू. मला असे वाटते की येणाऱ्या प्रवाशांसाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती केली जाईल. आणि त्याचमुळे विकासाची नवी शिखरे गाठण्याच्या निर्धाराने पायाभूत सुविधांवर भर देत दोन्ही सरकारे खांद्याला भिडवून काम करीत आहेत.
मेहबूबाजींना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. जम्मूा-काश्मीरच्या सर्वसामान्य जनतेच्या हीतासाठी देवस्थान मंडळाने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल मी राज्यपालांचेही अभिनंदन करतो. आपणा सर्वांना माझ्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद!!!
M.Pange/ B. Gokhale
I was hearing Mehbooba ji. The enthusiasm with which she spoke of the future of J&K & her energetic leadership...I congratulate her: PM
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
We remember Mufti Sahab. He spent years in public life. One thing was always on his mind: to bridge the gap between Jammu & Srinagar: PM
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
Mehbooba ji always talks about the development of J&K when we meet. When such a thought is there, development is bound to happen: PM
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
This land is drawing students from all over the nation and this gives strength to India: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
Without 'Khel' there cannot be 'Khilna'...the person who plays, shines: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
This sports complex will help sports and will help sportsman spirit: PM @narendramodi at the public meeting https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
We are hosting FIFA U-17 World Cup and this has to be an opportunity for us to celebrate sports. The world should see our Yuva Shakti: PM
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
Where there is sports you can stay away from illness. Preventive healthcare is very important: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
Cleanliness ensures we remain free from illness: PM @narendramodi #MyCleanIndia https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
With this hospital people will not have to go very far for treatment. And the weather here is also very good: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
We all have to work together for the development of India and this development has to be quick paced and all inclusive: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
People of J&K respect Atal ji tremendously. He had a vision for the development of J&K: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3vQmx
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016
Centre and State Government are working together for the infrastructure development in J&K. Tourism potential is immense here: PM
— PMO India (@PMOIndia) April 19, 2016