जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ अंतर्गत, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (राज्य कायद्यांचे रूपांतर ) दुसरा आदेश २०२० जारी करण्यासाठी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी देण्यात आली.
जम्मू-काश्मीर नागरी सेवा (विकेंद्रीकरण आणि भरती) अधिनियम (२०१० चा कायदा क्रमांक XVI) अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील सर्व स्तरावरील नोक-यांसाठी अधिवास स्थिती लागू होण्यासाठी या आदेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे.
हा आदेश जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील सर्व पदांवर रोजगारासाठी निर्दिष्ट अधिवास निकष लागू करेल.
*****
B.Gokhale/ S.Kakade/P.Kor