Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरविषयीची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होय : पंतप्रधान

जम्मू आणि काश्मीरविषयीची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होय : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

“जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवली आहे.

या बैठकीनंतर जारी केलेल्या ट्विटर संदेशांचा माध्यमातून पंतप्रधान म्हणतात, 

“जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवून ती बळकट करणे याला आमच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य आहे. मतदारसंघांची पुनर्रचना जलदगतीने झाली पाहिजे, जेणेकरून निवडणुका घेता येतील आणि विकासाच्या कक्षेला बळकटी देणारे एक निर्वाचित सरकार जम्मू आणि काश्मीरला मिळेल.

परस्परभिन्न मतप्रवाहही समोरासमोर बसून आपापल्या दृष्टिकोनांबद्दल चर्चा करू शकतात, हेच आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मी जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांना सांगितले की, जम्मू काश्मीरला जनतेने- विशेषतः तरुणाईने राजकीय नेतृत्व दिले पाहिजे आणि आशा-आकांक्षांची पूर्तता होण्याची काळजी घेतली पाहिजे.”

 

 

 

* * *

S.Patil/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com