Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


जपानचे संरक्षणमंत्री इत्सुनोरी ओनडेरा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वीपासून जपानसमवेत असलेल्या दीर्घ स्नेहाचे त्यांनी स्मरण केले. भारत आणि जपान यांच्यात अलिकडच्या वर्षात विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी विस्तारत असल्याबद्दल पंतप्रधानांनी स्वागत केले.

संरक्षण सहकार्य हा भारत आणि जपान यांच्यातल्या सहकार्याचा मुख्य स्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारत आणि जपान यांच्या लष्करातले संबंध तसेच दोन्ही देशातल्या विविध संवाद यंत्रणा दृढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे स्वागत केले. उभय देशात संरक्षण तंत्रज्ञान सहकार्यात प्रगती होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीचे पंतप्रधानांनी स्मरण केले. यावर्षीच्या जपान भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor