जपानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री तारो कोनो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑक्टोबर 2018 मधल्या जपान भेटीनंतर त्यासंदर्भात घेतलेला कृती तपशील कोनो यांनी पंतप्रधानांना सादर केला.
2018 च्या ऑक्टोबरमधल्या यशस्वी भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. भारत आणि जपान यांच्यातली विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या ठाम कटिबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
जपानबरोबर या वर्षात होणाऱ्या वार्षिक परिषदेच्या पुढच्या फेरीसाठी भारत उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
Foreign Minister of Japan, H. E. Mr. Taro Kono calls on PM @narendramodi. https://t.co/He8NxcTn8K
— PMO India (@PMOIndia) January 7, 2019
via NaMo App pic.twitter.com/ubYqrpF1DJ