Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश  झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर आणि उदयपूरचे केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश  झाल्याबद्दल इंदूर आणि उदयपूरचे अभिनंदन केले. ही मान्यता शाश्वत विकास, निसर्ग आणि शहरी विकास यांच्यातील सुसंवाद जोपासण्यासाठी भारताची दृढ वचनबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या X या समाज माध्यमावरच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

इंदूर आणि उदयपूरचे अभिनंदन! ही मान्यता शाश्वत विकास, निसर्ग आणि शहरी विकास यांच्यातील सुसंवाद जोपासण्यासाठी आपली दृढ वचनबद्धता प्रदर्शित करते. हे यश सर्वांना आपल्या देशभरात हिरवेगार, स्वच्छ आणि अधिक पर्यावरणपूरक शहरी क्षेत्र निर्माण करण्यासाठी काम करत राहण्याची प्रेरणा देवो.”

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com